ठाणे : शहरात भटक्या श्वानाची संख्या वाढत असताना शहरभर फिरणाऱ्या मांजरीवर निर्बिजिकरणाविषयी कुठेही नियम नाही. शहरातील वाढत्या भटक्या श्वानाची संख्या, ( Dogs increased in Thane ) श्वानाचे निर्बिजिकरण ( Sterilization of dogs stopped in Thane ) करण्यासाठी प्रशासनाला जागा उपलब्ध होत नाहीये. या विषयावर आवाज उठवणारे लोकप्रतिनिधी नसबंदी केंद्रासाठी तसेच प्राण्यांच्या शवदाहिनीसाठी जागा देण्यास इच्छुक नसल्याचे समोर आले आहे.
मांजरीच्या नसबंदीचा प्रश्न कायम - ठाणे शहरात मागील चार वर्षांपासून बंद असलेले निर्बिजीकरण केंद्र अखेर मार्च २०२२ मध्ये सुरू होते. मात्र, शहरभर फिरणाऱ्या मांजरीच्या नसबंदीचे काय? असा प्रश्न ठाणेकरांना पडला आहे. पाळीव प्राणी परवाना नुतनीकरण या संदर्भात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. क्षमा शिरोडकर यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या की, २०१८ मध्ये नसबंदी शस्त्रक्रिया निविदेची मुदत संपली होती. म्हणून दिड कोटींची वाढीव तरतूद करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, वाढीव मागणीला मान्यता नाकारण्यात आली होती. त्यामुळे श्वानाचे निर्बिजिकरण केंद्र बंद होते.
नसबंदी केंद्रावर निर्बिजीकरण - ऑगस्ट २०१९ मध्ये नव्याने निविदा काढून मान्यता घेण्यात आली होती. २०२१ मध्ये मान्यता मिळाली पण, त्या वेळेस कोव्हीडची महामारी सुरू झाली होती. याच दरम्यान भटक्या श्वानाची संख्या वाढत असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. म्हणून २०२१ मध्ये पुन्हा नव्याने निविदा काढून व्हीटीम्स या सामाजिक संस्थेला जबाबदारी सोपविण्यात आली. मार्च २०२२ ते जून या चार महिन्यांत केवळ ६५० भटक्या श्वानावर वागळे इस्टेट येथील नसबंदी केंद्रावर निर्बिजीकरण करण्यात आल्याचे सांगितले आहे. वास्तविक दिवसाला निदान १५ भटक्या श्वानाचे दर महिन्याला ३०० श्वानावर नसबंदी करण्याचे महापालिका पशुवैद्यकीय विभागाचे उद्दिष्ट ( Thane Veterinary Department ) आहे. मात्र, शहरात एकमेव असणाऱ्या निर्बिजीकरण केंद्रांची संख्या, शस्त्रक्रिया झाल्यानंतर विश्रांतीसाठी लागणारे पिंजरे वाढवण्याची आवश्यकता आहे. सध्या महापालिका पशुवैद्यकीय रूग्णालयात शस्त्रक्रिया झाल्यानंतर प्राण्यांना ठेवण्यासाठी ७५ पिंजरे असून, यापैकी ५० पिंजरेच सुस्थितीत आहेत. तर, २५ पिंजऱ्यांच्या दुरूस्तीच्या प्रतिक्षेत असल्याचे चित्र आहे.
ठाण्यात प्रशासन उदासीन - आज घडीला ठाणे महापालिकेच्या हद्दीत अतिवेगाने वाढणाऱ्या भटक्या श्वानाच्या संख्येवर नियंत्रण ठेवायचे असेल तर, शहरात किमान तीन ते चार ठिकाणी श्वान निर्बिजिकरण केंद्रासाठी जागा असणे गरजेचे आहे. त्याच बरोबर मणुष्यबळाची संख्या देखील वाढवणे आवश्यक आहे. आज मुंबईत ४२ पशुवैद्यकीय अधिकारी असून, मुंबई, नवीमुंबईत पशुवैद्यकीय रूग्णालय आहे. तर, मीरा भाईंदरमध्ये लवकरच रूग्णालय सुरू होण्याची शक्याता आहे. त्यामुळे वागळे एमआयडीसी येथील एकमेव महापालिकेचे निर्बिजीकरण केंद्र असणे ही चिंतेची बाब असल्याचे जाणकारांचे मत आहे.
हेही वाचा - CWG 2022 : भारताने उघडले विजयाचे खाते; स्मृती मंधानाच्या अर्धशतकाच्या जोरावर पाकिस्तानवर मात