ठाणे - जिल्ह्यातील एकूण ३५ विविध पोलीस ठाण्यात शस्त्र पूजन करण्यात आले आहे. यामध्ये कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यातही शस्त्रपूजन करण्यात आले असून यावेळी पूजाअर्चा फुलहारांनी सजवून पोलिसांच्या ताफ्यात असलेल्या रायफली, बंदुका, आणि इतर शस्त्र पूजन करण्यात आले.
...त्यामुळे या दिवशी शस्त्रपूजनाची पंरपरा -
प्राचीन काळापासून याच दिवसापासूनच युद्धावर जाण्याची क्षत्रियांची परंपरा होती. या महिन्यापासून पावसाळा संपतो आणि हिवाळ्याला सुरुवात होते. त्यामुळे या दिवसापासून युद्ध किंवा मोहिमांना सुरुवात करण्यात येत होती. त्यामुळे या दिवशी शस्त्रपूजनाची पंरपरा असल्याचे सांगण्यात येते.
शस्त्रगृहात रायफली, बंदुकाचे पूजन -
जिल्ह्यातील ३५ पोलीस ठाण्यातील शस्त्रगृहात असलेल्या रायफली, बंदुकाची आज दसऱ्याच्या निमित्ताने कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात शस्त्रपूजन करण्यात आले. बाजारपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी शस्त्रपूजा केले.