ठाणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सर्वच स्थरावरून टीका होत असतांना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड ( MLA Jitendra Awhad ) यांनी देखील कोश्यारी यांचा चांगलाच समाचार घेतला. गुजरात, राजस्थानची लोक महाराष्ट्रातून निघून गेली तर, महाराष्ट्राकडे पैसा राहणार नाही असं वक्तव्य केल्यानंतर राज्यपालांनी केले होते. त्यावर राज्यात ठिक ठिकाणी निषेध होत आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड ( Controversial statement of Jitendra Awhad ) यांनी राज्यपालांच्या वक्तव्यावर वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
-
कोश्यारी माफी मागा
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 30, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
हि मराठी माती कर्तृत्वाचा घामाचा नेहमी सन्मान करते गुजराथी राजस्थानी ह्यांना समान संधी देते अगदी विधानसभेत देखील यांना पाठवतो
तेव्हा हि माणसं त्यांच्या राज्यात का नाही राहून मोठी झाली त्यांना इथे का यावे लागले ...
कोश्यारी माफी मागा pic.twitter.com/R3CVMeK7S8
">कोश्यारी माफी मागा
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 30, 2022
हि मराठी माती कर्तृत्वाचा घामाचा नेहमी सन्मान करते गुजराथी राजस्थानी ह्यांना समान संधी देते अगदी विधानसभेत देखील यांना पाठवतो
तेव्हा हि माणसं त्यांच्या राज्यात का नाही राहून मोठी झाली त्यांना इथे का यावे लागले ...
कोश्यारी माफी मागा pic.twitter.com/R3CVMeK7S8कोश्यारी माफी मागा
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 30, 2022
हि मराठी माती कर्तृत्वाचा घामाचा नेहमी सन्मान करते गुजराथी राजस्थानी ह्यांना समान संधी देते अगदी विधानसभेत देखील यांना पाठवतो
तेव्हा हि माणसं त्यांच्या राज्यात का नाही राहून मोठी झाली त्यांना इथे का यावे लागले ...
कोश्यारी माफी मागा pic.twitter.com/R3CVMeK7S8
जोडे मारो आंदोलन - यावेळी आव्हाड यांचा बोलतांना भाषेवरील संयम देखील सुटला. राज्यपाल यांना महामहीम म्हटले जाते, त्यांना आदर दिला जातो, पण आता त्यांना त्यांची लायकी दाखवायची वेळ आली आहे. राज्यपालांनी माफी मागावी, राष्ट्रवादी त्यांना जोडे मारो आंदोलन करणार असल्याचे ते म्हणाले. पुढे बोलतांना ते म्हणाले की,राज्यपाल वक्तव्य करत असतांना मागून टाळ्या कोण वाजवत होते, ते हिजाड्या सारखे, आज त्यांनी मराठी माणसाचा नाही तर ,मराठी माणसाच्या अस्मितेचा अपमान केला आहे, मुंबईचे महत्त्व तुम्ही कमी करू शकत नाही. रक्ताचे पाट वाहिले आहेत मुंबई घेताना. मराठी माणसाच्या अस्मितेला धक्का पोहोचला तर, ऐकून घेणार नाही असं आव्हाड म्हणाले आहेत.
राज्यपाल नेमकं काय म्हणाले - आपल्या विविध विधानांमुळे चर्चेत असणाऱ्या राज्यपालांनी या वेळेस थेट मुंबईबाबत एक मोठं विधान केलं आहे. मुंबईत बाहेरून आलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. काम धंदा, व्यवसाय करण्यासाठी तसेच नाव कमावण्यासाठी अनेक जण स्वप्नाची नगरी मुंबईमध्ये येतात आणि मुंबईत आपली स्वप्नं पूर्ण करतात. म्हणूनच मुंबईला स्वप्नांचं शहर म्हटलं जातं. मात्र राज्यपालांनी यावेळी बोलताना, कधी कधी मी इथल्या लोकांना बोलतो महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही, असं थेट विधान केलं आहे. ही मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र मुंबईची ती ओळखही उरणार नाही, असेही राज्यपाल म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरेंनी घेतला समाचार - कोश्यारी ( governor bhagat singh Koshyari ) यांनी मुंबई व महाराष्ट्राबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) जोरदार हल्ला चढवला आहे. कोश्यारी यांनी महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा अपमान केला आहे. ते खपवून घेतले जाणार नाही. तसेच त्यांना कोल्हापुरी जोडे दाखवण्याची वेळ आली आहे असे ठाकरे म्हणाले मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
'ते पार्सल मराठी माणसाचा अपमान करत असेल तर....' - ज्या महाराष्ट्राचे मीठ तुम्ही तीन वर्ष खात आहात, त्या मिठाशी तुम्ही नमकहरामी केली आहे. जे नवहिंदूवादी आहेत. ज्यांना हिंदुत्वाचे मोड फुटले आहेत. ते कडवे असतील तर त्या मोडधारी सत्ताधारी हिंदूंना ते हिंदू असतील आणि मराठी असतील तर त्या सरकारने राज्यपालांविषयी भूमिका घेतली पाहिजे. जे पार्सल कुठून तरी पाठवले आहे. ते पार्सल राज्यपालपदाचा आदर राखत नसेल महाराष्ट्रात राहून जातीपाती आणि धर्मात आग लावण्याचे काम करत असेल मराठी माणसाचा अपमान करत असेल, तर त्यांना घरी पाठवायचे की तुरुंगात पाठवायचे हा निर्णय सरकारने घ्यावा, समस्त हिंदूंच्यावतीने मी ही मागणी करतो असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
खुर्चीचा मान ठेवा - महाराष्ट्राच्या नशिबी अशी माणसं का येतात? पुढे बोलताना उद्धव ठाकरेंनी म्हटले की, राज्यपाल म्हणून त्या खुर्चीचा मान राज्यपालांनी ठेवला पाहिजे. पण त्या खुर्चीत बसवलेल्या कोश्यारींनी त्या खुर्चीचा मान ठेवला नाही. गेल्या तीन वर्षांतील त्यांची विधाने असतील काही त्यांचे कॅमेऱ्याने टिपलेली दृष्य असतील ते पाहिल्यावर महाराष्ट्राच्या नशिबी असे माणसे का येतात हा प्रश्न पडतो. मी मुख्यमंत्री असताना लॉकडाऊनच्या काळात लोकांचे प्राण जात होते. तेव्हा यांना सर्वधर्मीयांची प्रार्थना स्थळे उघडण्याची घाई झाली होती. मी तो विषय वाढवला नाही. त्यांनी पत्र दिलं त्यावर मी उत्तर दिलं होतं. मी मुख्यमंत्री म्हणून तेव्हा जबाबदारी पार पाडली. मध्ये सावित्रीबाई फुलेंबद्दलही ते वादग्रस्त बोलल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
कोल्हापूरचा जोडा दाखवा - भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्या दोन-अडीच वर्षांच्या काळात सुंदर लेण्या शिवरायांचे गड-किल्ले व इतर सर्व चांगल्या गोष्टी पाहिल्या असतील. मात्र आता त्यांना कोल्हापूरचा जोडा दाखवण्याची देखील वेळ आली आहे. कारण कोल्हापुरी जोडा हेही महाराष्ट्राचं वैभव आहे. त्याचा अर्थ कसा लावायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र जगप्रसिद्ध कोल्हापुरी जोडे कोश्यारींना दाखवण्याची वेळ आली आहे.
राज्यपालांनी माफी मागावी, अमोल मिटकरी - महाराष्ट्र आणि मुंबईतील माणूस कर्तबगार आणि सक्षम आहे. मराठी माणसाच्या जीवावर अनेक राज्य पोसली जातात. आम्ही चटणी भाकर खाऊन पोट भरून इतरांना पोसणारी इमानदार माणसे आहोत. आपण मराठी माणसाचा अपमान केलाय. महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा असे ट्विट राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे.
मनसे नेते संदिप देशपांडेचा राज्यपालांना सल्ला - मुंबई महाराष्ट्राला मिळाली ती १०५ हुतात्म्यांच्या बलिदानामुळे. मुंबईची प्रगती आणि महाराष्ट्राची प्रगती इथे राहणाऱ्या मराठी माणसामुळे झालेली आहे. जे बाहेरचे आले, त्यांना मुंबईने सामावून घेतले आहे याचा अर्थ त्यांच्यामुळे मुंबईची प्रगती झाली नाही. मुंबई महाराष्ट्रात आहे राज्यपालांनी पहिले समजून घ्यावं. मराठी माणसामुळेच मुंबई आहे आणि महाराष्ट्र आहे तिथे काय कोणी बाहेरचे आले आणि त्यांनी प्रगती त्याच्यामुळे आपली प्रगती झाली नाही त्यांची प्रगती झालेली आहे असे संदिप देशपांडे म्हणाले.
हेही वाचा - महाराष्ट्राचा अपमान केल्यास कोल्हापुरी चप्पल दाखवू - उद्धव ठाकरे