ETV Bharat / city

उल्हास नदीतून होतेय पाणी चोरी, पाणी टंचाईमुळे अंबरनाथ- बदलापूरमध्ये टँकर लॉबी मालामाल

टँकरचालक उल्हास नदीच्या पात्रातून दरदिवशी १०० पेक्षा अधिक टँकर पाणी चोरुन सोसायट्यांमध्ये १ ते २ हजार रुपयांना विक्री करत आहेत.

उल्हास नदीतून पाणीचोरी
author img

By

Published : Apr 14, 2019, 11:07 AM IST

ठाणे - जिल्ह्यात ग्रामीण परिसरात पाण्याची भटकंती करताना ग्रामस्थ महिला दिसत होत्या. परंतु, आता शहरी भागातही पाणीटंचाई झळ जाणू लागल्याने विविध शहरातील सोसायटी आणि इमारतीमधील रहिवाशी टँकरच्या पाण्यावर अवलंबून असल्याचे चित्र दिसत आहे. टँकरचालकही याचा फायदा घेताना उल्हास नदीतून दिवसरात्र पाणी चोरुन त्याची मोठ्या किंमतीने विक्री करत असल्याचे समोर आले आहे.

उल्हास नदीतून टँकरने पाणीचोरी

बदलापूर-अंबरनाथ शहरात पाणीटंचाईमुळे टँकर लॉबी सक्रीय झाली आहे. पिण्याच्या पाण्यासोबत आता इमारतीच्या बांधकामासाठीही पाणीपुरवठा थेट उल्हास नदीतून उचलण्यात येत आहे. उल्हास नदीवरील पाण्याचे आरक्षण हे प्रत्येक शहरासाठी निश्चित केले आहे. पंरतु, असे असतानाही मोठ्या प्रमाणात नदीतून पाण्याची चोरी होताना दिसत आहे. टँकरचालक उल्हास नदीच्या पात्रातून दरदिवशी १०० पेक्षा अधिक टँकर पाणी चोरुन सोसायट्यांमध्ये १ ते २ हजार रुपयांना विक्री करत आहेत.

विशेष म्हणजे टँकर लॉबीला पाणी उचलण्याची परवानगीही घ्यावी लागत नाही. अथवा चोरणाऱ्यांना कुणाकडे पैसेही भरावे लागत नाहीत. पाण्याची चोरी ही पोलिसांसमोर होत असतानाही कोणतीही कारवाई केली जात नाही. यामुळे टँकर लॉबी मालामाल होत आहे.

पाणी टंचाईमुळे अंबरनाथ- बदलापूरमध्ये टँकर लॉबी मालामाल

ठाणे :- जिल्ह्यात ग्रामीण परिसरात पाण्याची भटकंती करताना ग्रामस्थ महिलांच्या झुंडी दिसत आहे.  आता तर शहरी भागातही पाणीटंचाई झळ जाणू लागल्याने विविध शहरातील सोसायट्या, इमारतीमधील रहिवाशी टँकरच्या पाण्यावर अवलंबून असल्याचे दिसून आले आहे. त्यातच टँकरचालक उल्हास नदीतून दिवसरात्र पाणी चोरून त्याची अव्वाच्या सव्वा दराने विक्री करत असल्याचे समोर आले आहे.

बदलापूर -अंबरनाथ शहरात पाणीटंचाईमुळे टँकर लॉबी सक्रीय झाली आहे. पिण्याच्या पाण्यासोबत आता इमारतीच्या बांधकामासाठीही पाणीपुरवठा थेट उल्हास नदीतून उचलण्यात येत आहे. उल्हास नदीवरील पाण्याचे आरक्षण हे प्रत्येक शहरासाठी निश्चित केले आहे. पंरतु असे असतानाही मोठ्या प्रमाणात नदीतून पाण्याची चोरी होताना दिसत आहे. उल्हास नदीच्या पात्रातून दरदिवशी शंभरहून अधिक टँकर पाणी चोरून सोसायट्यांमध्ये १ ते २ हजार रुपयांना विक्री करीत आहे. विशेष म्हणजे टँकर लॉबीला पाणी उचलण्याची परवानगीही घेतली जात नाही. अथवा चोरणाऱ्यांना कुणाकडे पैसेही भरावे लागत नाही. पाण्याची चोरी ही पोलिसांसमोर होत असतानाही तेही कोणतीच कारवाई करत नाहीत. तर ज्या प्रशासनाकडे याची जबाबदारी आहे. तेही कोणतीच कार्यवाही करताना दिसत नाही. यामुळेच टँकर लॉबीचे फवताना दिसत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.