नवी मुंबई - 26 जानेवारी 2014रोजी वाशी येथील विष्णूदास नाट्यगृहात राज ठाकरे यांनी उग्र भाषण केल्याने राज समर्थकांनी वाशी टोल नाका फोडला होता. त्यामुळे बेलापूर कोर्टाने राज ठाकरे यांच्याविरुद्ध वॉरंट जारी केले आहे. 6 फेब्रुवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
कार्यकर्त्यांनी फोडला होता टोलनाका
अनेक वेळा कोर्टात हजर राहण्याचे आदेश देऊनही राज ठाकरे हजर झाले नाहीत. वाशीमध्ये 26 जानेवारी 2014ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोल नाक्यासंबंधी आपली भूमिका मांडत प्रक्षोभक भाषण केले होते. त्यानंतर मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी वाशी टोलनाका फोडला होता.
कधीही झाले नाहीत हजर
याप्रकरणी बेलापूर कोर्टाने अनेकवेळा कोर्टात हजर राहण्यास राज ठाकरे यांना सांगितले होते. मात्र ते 2014 ते 2020 या कालावधीपर्यंत कधीही कोर्टात हजर झाले नव्हते. त्यामुळे बेलापूर कोर्टाने राज ठाकरे यांच्याविरुद्ध वॉरंट जारी केले असून त्यांना 6 फेब्रुवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.