ETV Bharat / city

Thane Municipal Corporation : ठाणे मनपाची प्रभाग रचना जाहीर, इच्छुक उमेदवारांच्या आशा पल्लवीत - ठाणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर

पालिका प्रशासनाने बहुरचनिय प्रभाग पद्धतीनुसार जो प्रस्ताव निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला होता तो अंतिम करण्यात आला आहे. (Ward structure of Thane Municipal Corporation) विशेष म्हणजे आज मंगळवारी निवडणूक प्रभागांच्या सीमा प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये शहारत ६ नगरसेवक वाढले आहेत. तर, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात एकूण ४ आणि दिवा येथे १ नगरसेवक वाढवण्यात आले आहे.

ठाणे मनपा
ठाणे मनपा
author img

By

Published : Feb 1, 2022, 2:54 PM IST

ठाणे - ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला. पालिका प्रशासनाने बहुरचनिय प्रभाग पद्धतीनुसार जो प्रस्ताव निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला होता तो अंतिम करण्यात आला आहे . विशेष म्हणजे आज मंगळवारी निवडणूक प्रभागांच्या सीमा प्रसिद्ध करण्यात आली आहे. (Thane Municipal Corporation election 2022) यामध्ये शहारत ६ नगरसेवक वाढले आहेत. तर, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात एकूण ४ आणि दिवा येथे १ नगरसेवक वाढवण्यात आले आहे.

व्हिडिओ

गेल्या निवडणुकीत सुमारे ५६ हजार लोकसंख्येचा १ या प्रमाणात ३२ प्रभागांची रचना

ठाणे महापालिकेत सध्या १३१ नगरसेवक आहेत २०१२ ची महापालिकेची निवडणूक २००१ च्या जनगणनेनुसार झाली होती. (Ward structure of Thane) तसेच, येणारी महापालिका निवडणूकही २०११ च्या जनगणनेनुसारच होणार आहे. २००१ साली ठाणे शहराची लोकसंख्या १२ लाख होती ती वाढून ती २०११ च्या जनगणनेत अधिकृतपणे १८ लाख ४१ हजार ४८८ झाली आहे. गेल्या निवडणुकीत सुमारे ५६ हजार लोकसंख्येचा १ या प्रमाणात ३२ प्रभागांची रचना करण्यात आली होती.

दिवा परिसरात ५ नगरसेवक वाढणार

दिवा परिसरात ४७ हजार लोकसंख्येसाठी वार्डांचा एक प्रभाग असे एकूण १३१ नगरसेवक असे चित्र होते. तर या निवडणुकीत ठाण्यात ११ नगरसेवक वाढले आहेत. प्रभागांची संख्या ४७ झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार शहरात ९० तर शहराबाहेर कळवा मुब्रा आणि दिवा परिसरात ५ नगरसेवक वाढणार असून त्यातही दिवा परिसरात १ तर कळव्यात चार नगरसेवकांचा एक नवा प्रभाग वाढणार आहे.

ग्रामीण भागाचा समतोल साधण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाने केला

यापूर्वी घोडबंदर २०, वागळे कोपरी ३२, वर्तकनगर १२, ठाणे शहर १२ तर जुन्या ठाण्यात ८ असे ८४ नगरसेवक होते. त्यात आता सहा नगरसेवकांची वाढ होणार असून त्यातील काही एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात तर काही घोडबंदर पट्ट्यात वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी कळव्यात १६ नगरसेवक होते त्यात ४ ने वाढ होवून ते २० होणार आहेत. मुब्रा २० तर दिव्यात १२ नगसेवक निवडून येणार असून शहर आणि ग्रामीण भागाचा समतोल साधण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाने केला असल्याचे सांगण्यात येत आहे.

हरकती साठी मुदत

या प्रारूप प्रभाग रचनेमध्ये ज्या नागरिकांना हरकती असतील त्यांनी आपल्या हरकती 14 फेब्रुवारी पर्यंत लेखी स्वरूपात द्यायच्या आहे. १६ फेब्रुवारी २०२२, हरकती आणि सूचनांवर सुनावणीचा अंतिम दिनांक २६ फेब्रुवारी २०२२ आणि अंतिम विवरणपत्र निवडणूक आयोगास सादर करण्याचा अंतिम दिनांक २ मार्च २०२२ रोजी असणार आहे. ही प्रक्रिया पार पडल्यावर निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार आहे.

हेही वाचा - अर्थसंकल्पात प्राप्तिकररचना जैसे थे; 2020 च्या अर्थसंकल्पाप्रमाणेच असणार 'ही' कररचना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.