ETV Bharat / city

ठामपा निवडणुकीत 'वंचित'सर्वाधिक जागांवर महिलांना संधी देणार; स्वाभिमानी रिपब्लिकनचे कार्यकर्ते वंचितमध्ये दाखल - Thane corporation election

वंचित समाजघटकातील महिलांना सर्वाधिक संधी देऊन त्यांना महापालिकेत लोकप्रतिनिधी म्हणून पाठविण्याचे पक्षश्रेष्ठींचे आदेश ( Vachit Bahujan Aghadi ticket distribution ) दिले आहे. वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष महेंद्र अनभोरे यांनी ( Vanchit Bahujan Aghadi Mahedra Anbhore ) दिली आहे. पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य या विषयांवरील प्रश्न वंचित बहुजन आघाडी जनतेसमोर जाणार आहे.

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष
author img

By

Published : Feb 4, 2022, 10:35 PM IST

ठाणे - ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये ( Thane corporation election ) वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. या निवडणुकीमध्ये वंचितकडून महिलांना सर्वाधिक जागांवर संधी देण्यात येणार आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे, शहराध्यक्ष महेंद्र अनभोरे यांनी दिली आहे.

ठाणे महानगर पालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीची भूमिका जाहीर करण्यासाठी आज बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी आघाडी आणि निवडणुकीबाबत माहिती दिली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने चांगली मते घेतली आहेत. त्यामुळे ठाणे महानगर पालिकेच्या सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याचा वंचित बहुजन आघाडीचा मनोदय आहे. त्यादृष्टीने पक्षाची बांधणी पूर्ण झाली आहे. वंचित समाजघटकातील महिलांना सर्वाधिक संधी देऊन त्यांना महापालिकेत लोकप्रतिनिधी म्हणून पाठविण्याचे पक्षश्रेष्ठींचे आदेश ( Vachit Bahujan Aghadi ticket distribution ) दिले आहे. वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष महेंद्र अनभोरे यांनी ( Vanchit Bahujan Aghadi Mahedra Anbhore ) दिली आहे. पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य या विषयांवरील प्रश्न वंचित बहुजन आघाडी जनतेसमोर जाणार आहे.

हेही वाचा-Rahul gandhi Goa Rally : गोव्यातील गरीबांना महिन्याला ६ हजार रुपये, राहुल गांधींचे आश्वासन

ठाणे शहराची 47 जणांची जंबो कार्यकारिणी जाहीर

आगामी पालिका निवडणुकीत मनसेने ठाणे विकास आघाडीचा प्रस्ताव ठेवला आहे. याबाबत अद्याप तसा कोणताही प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीकडे आलेला नाही. मात्र, तसा प्रस्ताव आला तरी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हेच त्याबाबत निर्णय घेतील, असे वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी सांगितले. यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनुप मित्रा यांच्यासह संदीप खरात, उमेश दुबे, पंडागळे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. वंचित बहुजन आघाडीने ठाणे शहराची 47 जणांची जंबो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

हेही वाचा-Accident on Daryapur Anjangaon Road : दर्यापूर-अंजनगाव मार्गावर कारचा भीषण अपघात, तरुणीचा जागीच मृत्यू

‘त्यांचा’ विचारही वंचित करीत नाही
शहराध्यक्षांवर ठेकेदारीचा आरोप करीत काहीजणांनी पक्ष सोडला असल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता, अध्यक्ष हे ठेकेदार आहेत. यामध्ये दुमत नाही. पण, ते आपल्या पोटापाण्याचा व्यवसाय करीत आहेत. त्यावर आक्षेप घेण्याचे कारण नाही. मात्र, जे पक्ष सोडून गेले आहेत. त्यांची दखलही पक्ष घेत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून झालेल्या टीकेला आम्ही महत्वच देत नाही, असेही वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी सांगितले.
हेही वाचा-Old Currency In Shirdi : भक्तांकडून साईबाबांना जुन्या नोटांचं दान.. तिजोरीत तीन कोटींच्या बंद नोटा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.