ETV Bharat / city

Ganesh idols to Canada : ठाण्यातील गणेश मूर्ती निघाल्या कॅनडाला; समुद्रमार्गे करणार अडीच महिन्यांचा प्रवास - ठाण्यातील गणेशमूर्ती जाणार कॅनडाला

ठाण्यातील श्री गणेशालय (Shri Ganeshalay) या कार्यशाळेत तयार होणाऱ्या गणेश मूर्त्यांचे (Ganesh Murti) पॅकिंग सुरू आहे. या मूर्ती थर्माकोल पुठ्ठा आणि व्यवस्थित रॅपिंग करून आता गुजरातला 25 मूर्ती रवाना होत आहेत. तेथून त्या समुद्रामार्गे कॅनडाला (Ganesh Idol to Canada) पोहचणार आहेत.

thane ganesh murti
गणेशमूर्ती तयार करताना वडके कुटुंब
author img

By

Published : Apr 14, 2022, 5:30 PM IST

Updated : Apr 14, 2022, 6:41 PM IST

ठाणे - ठाण्यातील पातलीपाडा येथे राहणाऱ्या वडके कुटुंबीयांचा गणेशमूर्ती (Thane Ganesh Idol) बनवण्याचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. दरवर्षी हजारो मूर्त्या बनवून त्याचा होलसेल विक्रीचा त्यांचा व्यवसाय आता कोरोनानंतर जम धरू लागला आहे. या वर्षी जवळपास 2000 गणेशमूर्ती ते विदेशात (sending 2000 Ganesh idols abroad) पाठवत आहेत.

प्रतिनिधींनी घेतलेला आढावा

ठाण्यातील श्री गणेशालय या कार्यशाळेत तयार होणाऱ्या मूर्त्यांचे पॅकिंग सुरू आहे. या मूर्ती थर्माकोल पुठ्ठा आणि व्यवस्थित रॅपिंग करून आता गुजरातला 25 मूर्ती रवाना होत आहेत. तेथून त्या समुद्रामार्गे कॅनडाला पोहचणार आहेत. यासाठी अडीच महिन्यांचा कालावधी लागणार आहे. दसऱ्यानंतर या कार्यशाळेत मूर्ती तयार करण्याचे काम सुरू होते आणि मग टप्प्या टप्प्याने मूर्ती मागणीनुसार पोहचवण्याचे काम सुरूच असते. वर्षभर वडके कुटुंबीय या व्यवसायात झोकून देऊन वर्षभरात 20 लाखांचा व्यवसाय करतात. त्यात 12 लाखांची विदेशातील ऑर्डर ते घेतात.

प्लास्टर ऑफ पेरीस ची मागणी घटली - आता दिवसागणिक समाजात प्रबोधन होत असल्यामुळे आता शाडूची माती आणि कागदाच्या लागद्याची गणेशमूर्ती ची मागणी वाढली असून राज्य सरकारच्या निर्बंधांमुळे 4 फुटांपर्यंत च्या उंचीच्या मूर्ती बनवल्या जात आहेत.

हे काम करणारे कारागीर ही दिवसाला 800 रुपयांच मानधन घेतात त्यामुळे शाडूच्या मूर्तींची किंमत वाढते हे काम करण्यासाठी वेळ ही जास्त लागतो एवढेच माही तर शाडूच्या मातीच्या मूर्ती या वजनाने जास्त जड असतात त्यामानाने प्लास्टर ऑफ पेरीस च्या मूर्ती हलक्या आणि स्वस्त असतात.

ऑस्ट्रेलिया केनडा नेदरलँडला जातात मूर्ती- श्री गणेशालय या मूर्तीशाळेत दरवर्षी हजारो मूर्ती बनवल्या जातात. यातील 2000 मूर्ती विदेशात जातात आणि त्यामुळे वडके कुटुंबीयांचा 12 महिने व्यवसाय होतो. या मूर्ती पॅकिंग करण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते आणि मूर्तीच्या उंचीनुसार तिचा खर्च देखील वाढत असतो.

समुद्रमार्गे वाहतुकीचा खर्च कमी - या मूर्ती विमानाने देखील पाठवता येतात. मात्र, त्याचा खर्च हा जास्त असतो. त्यामुळे या मूर्ती समुद्र मार्गे सागरी वाहतुकीने पाठवल्या जातात. समुद्रमार्गे येणारा वाहतुकीच्या 8 पट खर्च हा विमानाने पाठवण्यासाठी येतो. त्यामुळे वेळ जास्त जरी लागत असला तरी तो परवडतो असे वडके कुटुंबीय सांगत आहेत.

पेट्रोल डिझलचा परिणाम व्यवसायावर- दररोज वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझलचा खर्च हा वाढत आहे. कारण पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती वाढत असल्यामुळे त्याचा परिणाम उत्पादन खर्चावर होत आहे. यावर्षी मूर्तींच्या जवळपास 30 टक्के किंमती वाढणार आहेत असे मूर्तिकार सांगत आहेत. शाडूची माती गुजरातवरून येते, रंग आणि त्यासाठी लागणाऱ्या इतर शोभेच्या वस्तूंची किंमत देखील वाढली असल्यामुळे यंदा मूर्तींच्यां किंमतीत वाढ झाली आहे.

ठाण्यात मूर्तिकार संगठना - दरवर्षी बदलणारे सरकारी नियम आणि त्यामुळे व्यवसायावर होणारा परिणाम लक्षात घेता होणारे नुकसान आणि अडचणी सोडवण्यासाठी ठाण्यातील मूर्तिकारांनी आपली संघटना देखील बनवली आहे. तिच्या माध्यमातून आता समस्या सोडवल्या जाणार आहेत. कोरोनामुळे दोन वर्षे अत्यंत खराब गेली असल्याचे या वेळी मूर्तिकारांनी सांगितले आहे. या काळात व्यवसाय अगदीच डबघाईला आला होता. यावर्षी यात सुधारणा होईल अशी आशा वडके कुटुंबियांना आहे

Last Updated : Apr 14, 2022, 6:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.