ETV Bharat / city

शाळा, महाविद्यालये, रेल्वे स्थानक बॉम्बने उडविण्याची धमकी.. ठाणे पोलीस शाळेच्या मेलवर आयडीवर दहशतवाद्यांचा ईमेल - शाळा महाविद्यालये व रेल्वे स्टेशन बॉम्बने उडविण्याची धमकी

ठाण्यातील कोर्टनाका येथील ठाणे पोलीस शाळेच्या मेल आयडीवर शाळा, महाविद्यालय आणि रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ईमेल आल्याने खळबळ उडाली आहे. संपूर्ण हिंदुस्थानात जिहादचे पालन करण्यासाठी कुर्बानी आणि धमाका हे दोन मार्ग असल्याचे या मेलवरील मजकूरात म्हटले आहे. या घटनेप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणे पोलिसांच्या सायबर कक्षाकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

plant a bomb at school
plant a bomb at school
author img

By

Published : Jan 23, 2022, 6:46 PM IST

Updated : Jan 23, 2022, 6:54 PM IST

ठाणे - ठाण्यातील कोर्टनाका येथील ठाणे पोलीस शाळेच्या मेल आयडीवर शाळा, महाविद्यालय आणि रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ईमेल आल्याने खळबळ उडाली आहे. संपूर्ण हिंदुस्थानात जिहादचे पालन करण्यासाठी कुर्बानी आणि धमाका हे दोन मार्ग असल्याचे या मेलवरील मजकूरात म्हटले आहे. या घटनेप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणे पोलिसांच्या सायबर कक्षाकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

ठाणे पोलीस स्कूलच्या मेलवर लष्कर-२९ लष्कर २२ ॲट दि रेट प्रोटोनमेल डाॅट काॅम या मेलवरून मिशन २२ असा विषय लिहिलेला एक मेल आला होता. त्यांनी हा मेल उघडला असता "मै जावेद खान लष्कर २९ का प्रमुख होने के नाते मेल भेज रहा हूँ .... हमारा एकही मक्सद है, पुरे हिंदुस्थान मे जिहाद का पालन हो.. तभी यह देश प्रगती करेगा. इस लिए हमने दो मार्गो का स्विकार किया है कुर्बानी.. और धमाका.." लष्कर २९ मे कई मुजाहिद सदस्य है, जो हर घर मे जिहाद पहुँचाना चाहते है.. लष्कर २९ जिहाद को मानने वाली हिंदुओ की संघटना है..'

ठाणे पोलीस शाळेच्या मेलवर आयडीवर दहशतवाद्यांचा ईमेल

बिना धमाके के लोगो को समझ नही आती. हिंदुस्थान मे जिहाद पालन करने मे सबसे बडी प्राॅब्लेम यहॉ की एज्युकेशन सिस्टम है.. यहा की एज्युकेशन सिस्टम बंद करके सिर्फ मदरसा द्वारा शिक्षा देनी चाहिए. तभी जिहाद के बारे मे पुरी जानकारी मिलेगी. हम मुंबई के स्कुल और काॅलेज मे धमाके करेंगे. असे या मजकुरात म्हटले आहे.

ठाण्यात गुन्हा दाखल, तपास सुरू -

या मेलमध्ये डोंबिवलीतील काही नागरिकांची नावे लिहिली आहेत. शिक्षिकेने या घटनेची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिकेस दिल्यानंतर ठाणेनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा समांतर तपास सायबर कक्षाकडून सुरू आहे.

Last Updated : Jan 23, 2022, 6:54 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.