ETV Bharat / city

Ulhasnagar Crime Branch: मौजमजेसाठी चोऱ्या करणाऱ्यांना उल्हासनगर गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या - ठाण्यात घरफोडी करणाऱ्या चोरट्याल गुन्हे शाखेकडून अटक

घरफोडी व मोबाईल चोरणाऱ्या चोरट्यांना बेड्या ठोकण्यात उल्हासनगर गुन्हे शाखेला यश आले आहे. याबद्दलची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी दिली आहे. यामध्ये, सराईत चोरट्यांसह एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. दरम्यान, यांच्याकडून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मौजमजेसाठी चोऱ्या करणाऱ्यांना उल्हासनगर गुन्हे  शाखेने बेड्या ठोकल्या

author img

By

Published : Jul 28, 2022, 6:52 PM IST

ठाणे - मौजमजा करण्यासाठी घरफोडी व मोबाईल चोरणाऱ्या चोरट्यांना बेड्या ठोकण्यात उल्हासनगर गुन्हे शाखेला यश आले आहे. याबद्दलची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी दिली आहे. यामध्ये, सराईत चोरट्यांसह एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. दरम्यान, यांच्याकडून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सुदर्शन प्रल्हाद सकपाळ (वय १८ रा. बदलापूर) ऋतिक शांताराम मालूसरे (वय १८ रा. बदलापूर ) अकबर अली शेख वय ३७, रा. अंबरनाथ) आणि फाहद ईंजिनीयर अन्सारी असे अटक केलेल्यांची नावे आहेत.

गुन्हे शाखेचे पथक करीत होते संमातर तपास - गेल्या काही दिवसापांसून उल्हासनगर पोलीस परिमंडळ चार मधील कार्यक्षेत्रातील विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडी चोरी, मोटर सायकल चोरी, मोबाईल चोरी या दाखल गुन्हयाचा संमातर तपास उल्हासनगर गुन्हे शाखेचे पथक करीत होते. त्यातच गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून संशयीत आरोपी सुदर्शन प्रल्हाद सकपाळ, ऋतिक शांताराम मालूसरे या दोघांना बदलापूर भागातून ताब्यात घेऊन चौकशी केली असता, एका अल्पवयीन चोरट्यासह हे त्रिकुट केवळ मौजमजेसाठी धूम स्टाईलने मोबाईलसह घरफोडी व दुचाकी लंपास करीत असल्याची कबुली दिली.

14 ते 15 घरफोडीसह इतरही गुन्हे दाखल - अकबर अली शेख या सराईत चोरट्याला अंबरनाथमधून अटक करून त्याच्याकडून बदलापूर शहरातील घरफोडीतील दागिने हस्तगत करण्यात आली. या सराईत चोरट्यावर यापूर्वीही 14 ते 15 घरफोडीसह इतरही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. शिवाय याचा साथीदार फहाद इंजिनियर अन्सारी यालाही मुद्देमालासह अटक केली.

चोरट्याचा एक साथीदार फरार - अशा प्रकारे गुन्हे शाखेच्या पथकाने आतापर्यत ४ चोरट्यांना अटक केली. तर, अल्पवीयन चोरट्याची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आहे. मात्र, अल्पवयीन चोरट्याचा एक साथीदार फरार असून पोलीस त्याच्या मागावर असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी दिली आहे.

हेही वाचा - Smart Cycle Project Scam : स्मार्ट सायकल प्रकल्पात 20 कोटी रुपयांचा घोटाळा? '2 लाखाला एक सायकल'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.