ठाणे - उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी शिवतीर्थ येथे घेतलेल्या दसरा मेळाव्यात जाणीवपूर्वक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) त्यांच्या कुटुंबा वर टीका केले होती. त्याच्याच विरोधात आज ठाण्यातील मनोरुग्णालय येथे शिंदे गटातील महिला आघाडी ( Women Alliance of Shinde group ) यांनी मनोरुग्णातील दोन बेड राखीव केलेले आहेत. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानाच्या विरोधात उद्धव ठाकरे यांचे मानसिक विचार बिघडलेले असून त्यांना उपचाराची गरज आहे.
ठाकरेंनी टीका केल्याचा आरोप - ठाकरे यांच्यावर उपचार मनोरुग्णालयात करावा अशी मागणी करत शिंदे गटाच्या महिला आघाडी यांनी ठाणे मनोरुग्णालय येथील अधिकाऱ्यांना आपले निवेदन दिलेले आहे. उद्धव ठाकरे यांनी भर मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले आहे. परंतु त्यासोबत त्यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे तसेच एकनाथ शिंदे यांचा नातू रुद्रांश श्रीकांत शिंदे याच्यावरती देखील खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्याचा आरोप ठाणे महिला आघाडी अध्यक्ष मीनाक्षी शिंदे यांनी केला आहे.
मीनाक्षी शिंदे यांचा इशारा - आता फक्त दोन बेड आम्ही रिजर्व केलेले असून भविष्यात पूर्ण वोर्ड राखीव करावा लागेल असे देखील ते यावेळी बोलत होत्या. तर, आमचा संयम पाहू नका आता आम्ही संयम बाळगला आहे, भविष्यात आक्रमक होऊ असा इशारा देखील यावेळी मीनाक्षी शिंदे यांनी दिला आहे.