ठाणे : शेजारी असलेले दुकानदार एका पुतळ्याच्या वादातून पक्के वैरी झाल्याची घटना समोर आली आहे. लगतच्या दुकानाला अडचण ठरत असलेला पुतळा हटविण्यावरून एका दुकानदारासह त्याच्या दोन मुलांनी शेजारी असलेल्या दुकानदारासह दोन महिलांना दुकानात घुसून बेदम मारहाण ( Intruded and brutally beaten ) केली आहे. मारहाणीचा प्रकार सीसीव्हीटीत कैद ( beating caught on CCTV ) झाला आहे. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी हल्लेखोर दुकानदार, त्याच्या दोन मुलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मारहाणीत तिघे जखमी.. डोंबिवली पूर्वेकडील नेहरू क्रॉस फडके रोडला राजेंद्र शेलार यांचे कपड्यासह इतर साहित्य विक्रीचे दुकान आहे. त्याच दुकानाच्या बाजूला आरोपी देवराज पटेल यांचे देखील दुकान आहे. देवराज पटेल हे आपल्या दुकानातील कपड्याचा पुतळा शेलार यांच्या दुकानासमोर लावून जाणूनबुजून अडचण निर्माण करत होते. अनेकदा विनंती करूनही आरोपी देवराज हे काही ऐकत नव्हते. त्यातच मंगळवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास हा वाद उफाळून आला. त्यावेळी देवराज यांनी शेलार यांच्या दुकानाला लावून कपड्याचा पुतळा ठेवला. दुकानदार राजेंद्र शेलार यांनी पुतळा बाजूला हटवा, असे सांगितले. यावरून शाब्दिक बाचाबाची झाली. अखेर संतापलेल्या देवराज पटेल-दुबरिया, त्यांचे दोन मुले मयूर, प्रितेश यांनी राजेंद्र शेलार यांच्यासह पत्नी सुवर्णा, मेहूणी अंजना यांना छत्रीच्या साह्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत राजेंद्र शेलार, पत्नी सुवर्णा, मेहूणी अंजना असे तिघे जखमी झाले.
हेही वाचा - Cabinet Expansion Of Shinde Govt: शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; वाचा संभाव्य मंत्रिमंडळाची यादी
दुकानातील सामानाचे देखील नुकसान..तक्रादार शेलार यांच्या दुकानातील सामानाचे देखील नुकसान झाले. हा सर्वप्रकार दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दुसरीकडे हल्लेखोर दुकानदार देवराज पटेल दुबरिया, त्यांची मुले मयूर, प्रितेश यांच्या विरोधात रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊन पोलीस आरोपींना पकडत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा - Kanwar Yatra : खिळ्यांची चप्पल घालून महाराष्ट्रीयन महादेव भक्त निलेश करतोय केदारनाथ ते हरिद्वार कावड यात्रा