ETV Bharat / city

IPL Betting : हायप्रोफाईल गेस्ट हाऊसमध्ये आयपीएलवर सट्टेबाजी करणाऱ्या दोघांना न्यायालयीन कोठडी - Thane Latest News

हायप्रोफाईल गेस्ट हाऊसच्या बंद खोलीत आयपीएल सामन्यावर सट्टेबाजी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आले होते. त्यानंतर ६ मार्च रोजी दुपारच्या सुमारास दोघा बुकींना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसाची पोलीस कोठडी ( Two days police custody ) सुनावली आहे.

IPL Bettors
IPL Bettors
author img

By

Published : Apr 7, 2022, 4:21 PM IST

ठाणे: कल्याण एन एक्स या हायप्रोफाईल गेस्ट हाऊसच्या बंद खोलीत आयपीएल सामन्यांवर सट्टेबाजी सुरु असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात सट्टेबाजांवर गुन्हा दाखल करून दोघा बुकींना बेड्या ( Two bookies arrested ) ठोकल्या आहेत. भावीन शामजी अनम आणि मयूर हरीश व्यास, असे अटक करण्यात आलेल्या क्रिकेट बुकींची नावे आहेत.

आयपीएलवर सट्टेबाजी करणाऱ्या दोघांना न्यायालयीन कोठडी

ऑनलाईन लाखोंचा सट्टा - आयपीएल किक्रेट मॅचचा हंगामा सुरु होताच किक्रेट बुकींसह सट्टा लावणारे सक्रिय झाल्याचे दिसून आले आहे. चार दिवसापूर्वी उल्हासनगर मधील एका मोबाईल शॉपमध्ये, चोरीछुपे आयपीएल मॅचवर सट्टा ( Betting on IPL matches ) घेणाऱ्या चार बुकींना लाखोंच्या मुद्देमालासह अटक केले होते. ही घटना ताजी असतानाच कल्याण रेल्वे स्थानकासमोरील कल्याण एन एक्स या हायप्रोफाईल गेस्ट हाऊसच्या एका बंद खोलीत चोरीछुपे, आयपीएल मॅचवर सट्टा सुरु असल्याची माहिती महात्मा फुले ( Mahatma Phule Police Station ) पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर ५ मार्च रोजी सायंकाळी याठिकाणी छापेमारी केली असता, बंद खोलीत आयपीएल मधील आरसीबी विरुद्ध आरआर ( RCB vs RR ) यांच्या सामना वेळी ऑनलाईन लाखोंचा सट्टा सुरू असल्याचे आढळून आले.

दोन दिवसाची पोलीस कोठडी - पोलिसांनी पंचनाम करत सट्टा घेण्यासाठी वापरलेले मोबाईल, इतर इलेट्रीकल वस्तू जप्त करून, दोन बुकींसह ११ सट्टा लावणाऱ्या ( Filed a case against 11 speculators ) विरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यातील दोन बुकींना अटक केली आहे. ६ मार्च रोजी दुपारच्या सुमारास दोघा बुकींना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसाची पोलीस कोठडी ( Two days police custody ) सुनावली आहे.

हेही वाचा - लोकलमध्ये थुंकण्याच्या वादातून प्रवाशाला दगडाने मारहाण; हल्लेखोर प्रवासी अटकेत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.