ETV Bharat / city

मृतदेह आदला-बदली प्रकरण; कुटुंबीयांनी सामंजस्याने केले अस्थिविसर्जन, प्रशासनाशी सुरू ठेवणार लढा - मृतदेह आदला-बदली प्रकरणी प्रशासनाशी सुरू ठेवणार लढा

कोरोनाबाधित रुग्ण ठाणे महापालिकेच्या नव्याने बांधलेल्या ग्लोबल कोविड रुग्णालयात दाखल होते. यातील अर्धांगवायुचा आजार असलेले रुग्ण रुग्णालयात नसल्याची माहिती त्यांच्या कुटूंबीयांना रुग्णालयाने दिली होती. मात्र अर्धांगवायुचा आजार असलेले रुग्ण पळून कसे जाणार, असा प्रश्न नातेवाईकांनी विचारत याबाबत पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली. मात्र गायब झालेल्या रुग्णाचा मृतदेह दुसऱ्या कुटुंबाला दिल्याचे उघड झाले. त्यानंतर दुसरे रुग्ण हे जीवंत असून त्यांना पाहायला या असे रुग्णालयाच्या वतीने नातेवाईकांना सांगण्यात आले.

thane
मृताचे नातेवाईक
author img

By

Published : Jul 9, 2020, 8:37 PM IST

ठाणे - मृतदेहाच्या आदली बदली प्रकारणामुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. या प्रकाराने कोविड रुग्णालयात सुरू असलेल्या हलगर्जिपणाला उघड केले. याबाबत विभागीय चौकशी सुरू आहे. पण ज्या कुटुंबाने या यातना सहन केल्या त्यांचा आजही याबाबत प्रशासनावर मोठा रोष आहे. या प्रकाराने आपल्या माणसाचे शेवटचे दर्शनही न घेता आलेल्या दोन्ही कुटुंबाने सामंजस्य दाखवत यातील एका रुग्णाचे गायमुख खाडीत अस्थिविसर्जन केले. यावेळी मृत झालेल्या दुसऱ्या रुग्णाचे कुटुंबीय देखील सहभाही झाले होते. प्रार्थना केल्यानंतर कोणत्याही राजकारणाला बळी न पडता न्याय मिळण्यासाठी पुढे लढा दिला जाणार असल्याची माहिती रुग्णांच्या नातेवाईकांनी दिली.

काय होता मृतदेह आदला-बदली प्रकार

कोरोनाबाधित रुग्ण ठाणे महापालिकेच्या नव्याने बांधलेल्या ग्लोबल कोविड रुग्णालयात नाहीत, असे त्यांच्या कुटुंबीयांना रुग्णालयाकडून सांगण्यात आले. ते रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचे कुटुंबीय रुग्णालयाखाली थांबून असायचे. कारण त्यांना अर्धांगवायुचा आजार होता. त्यांचे वय ७१ होते. अर्धांगवायुचा आजार असलेले रुग्ण पळून कसे जाणार, असा प्रश्न नातेवाईकांनी विचारत याबाबत पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली. याचा शोध सुरू असताना याच रुग्णालयात विरोधी पक्षनेते यांचा दौरा होता. तेव्हा त्यांची भेट झाल्यावर त्यांनी याबाबत प्रशासनाला धारेवर धरले. याबाबत ठोस उपाययोजना करण्याचे आवाहन देखील केले.

दोन कोरोनाबाधित रुग्ण 29 जून रोजी कोविड साथीचे विशेष रुग्णालय असलेल्या ग्लोबल रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर यातील एका कोरोनाबाधित रुग्णाच्या कुटुंबाना त्यांचा रुग्ण गायब झाल्याचे सांगितले. मात्र गायब झालेल्या रुग्णाचा मृतदेह दुसऱ्या कुटुंबाला दिल्याचे उघड झाले. त्यानंतर दुसरे रुग्ण हे जीवंत असून त्यांना पाहायला या असे रुग्णालयाच्या वतीने नातेवाईकांना सांगण्यात आले.

आधीच एका रुग्णाचा मृतदेह दुसऱ्या कुटुंबीयांना देवून त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले होते. आता दुसरे कोरोनाबाधित रुग्ण देखील उपचारादरम्यान मृत झाले. मात्र त्यांच्या डिस्चार्ज कार्डवर तिसऱ्याच रुग्णाचे नाव लिहिन्यात आले होते. हा सर्व गोंधळ हा तिन्ही कुटुबांना त्रासदायक आणि धक्कादायक देखील होता. प्रशासनाच्या या अक्षम्य हलगर्जिपणामुळे महापालिका प्रशासनाची मोठी नाचक्की झाली आहे. पण आता या सर्व बाबतीत भाजपने मोठा लढा उभा केला आहे. त्यांनी याबाबत राज्यपाल यांची भेट घेवून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात महापालिका प्रशासनाने आतापर्यंत कोणतीही माहिती समोर आणली नाही. ठाण्यात सर्वसामान्य मानसामधे याबाबत मोठा संताप आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.