ETV Bharat / city

शहाड रेल्वे स्थानकात रूळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेत दोघांचा मुत्यू - शहाड

शहाड रेल्वे स्थानकात रेल्वे पादचारी पुल असताना देखील काही प्रवासी आपला जीव धोक्यात घालून रूळ ओलांडतात. गेल्या ४ दिवसात शहाड रेल्वे स्थानकात दोघांचा मृत्यू झाला आहे.

कल्याण लोहमार्ग पोलीस
author img

By

Published : May 21, 2019, 6:43 PM IST

ठाणे - कल्याणजवळ असलेल्या शहाड रेल्वे स्थानकात रूळ ओलांडताना एक्सप्रेसची धडक लागल्याने प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर, दुसऱया एका घटनेत २ दिवसांपूर्वी उध्दव कसरा या प्रवाशाचा रूळ ओलांडताना याठिकाणीच लोकलच्या धडकेत मृत्यू झाला होता.

कल्याण लोहमार्ग पोलीस

शनिवारी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात रेल्वे गाडीने धडक दिल्याने उध्दव कसरा (वय २७, राहणार उल्हासनगर) अपघाती मुत्यू झाला. तर, सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास वाराणसी एक्सप्रेसने धडक दिल्याने गिरिष मेघराज कोटवानी (वय ३९, राहणार उल्हासनगर) यांचा दुर्दैवी मुत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अपघाती मुत्यूची नोंद केली आहे.

शहाड रेल्वे स्थानकात रेल्वे पादचारी पुल असताना देखील काही प्रवासी आपला जीव धोक्यात घालून रूळ ओलांडतात. गेल्या ४ दिवसात शहाड रेल्वे स्थानकात दोघांचा मृत्यू झाला आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यावर रेल्वे पोलिसांनी, आरपीएफ यांनी कारवाई करणे गरजेचे आहे. शहाड रेल्वे स्थानकावर सुरक्षा नसल्यामुळे दिवसाढवळ्या मोबाईल चोरांचा सुळसुळाट आणि वावर असतो. रेल्वे प्रशासनाने त्वरित लक्ष घालून एक कायमस्वरूपी स्टेशन मास्तर शहाड स्टेशनला द्यावा, अशी मागणी कल्याण कसारा वेल्फेअरचे महासचिव निलेश देशमुख यांच्यावतीने करण्यात आली आहे.

शहाड रेल्वे स्थानकात रूळ ओलांडताना दोघांचा मुत्यु               

ठाणे : कल्याण नजीक असलेल्या शहाड रेल्वे स्थानकात रूळ ओलांडताना एक्स्प्रेसची धडक लागल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. गीरीष मेघराज कोटवानी असे मयत तरुणाचे नाव आहे. तर दोन दिवसांपूर्वी उध्दव कसरा या प्रवाशाचा रूळ ओलांडताना या ठिकाणी लोकलच्या धडकेत मृत्यू झाला होता. दोन्ही अपघाताची नोंद कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 

शहाड रेल्वे स्थानकात रेल्वे पादचारी पुल असताना देखील काही प्रवासी आपला जीव धोक्यात घालून रूळ ओलांडताना दिसून येतात. गेल्या चार दिवसात शहाड रेल्वे स्थानकात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात रेल्वे गाडीने धडक दिल्याने उध्दव कसरा  वय (२७) वर्षे रा. उल्हासनगर अपघाती मुत्यु झाला. त्यानंतर काल सोमवारी दुपारी  दोन च्या सुमारास वाराणसी एक्स्प्रेसने धडक दिल्याने गीरीष मेघराज कोटवानी वय (३९)वर्ष रा. उल्हास नगर यांचा दुर्दैवी मुत्यु  झाल्याची घटना घडली. या बाबत कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अपघाती मुत्यु ची नोंद केली आहे.

शहाड रेल्वे स्थानकावर पादचारी पूल असताना देखील प्रवासी रूळ ओलांडतात त्यातून होनाऱ्या अपघातात नाहक जीव गमवावा लागतो त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे रुळ ओलंडणाऱ्यावर  रेल्वे पोलिसांनी ,आर् फी. एफ् यांनी आता धडक कारवाई होणे हेही गरजेचे आहे. याबाबत कल्याण कसारा वेलफेअरचे महासचिव निलेश देशमुख यांनी कल्याण पुढील रेल्वे स्थानकावर आरपीएफ आणी जीआरपीचे दुर्लक्ष असून शहाड स्टेशनवर कोणत्याही प्रकारची सुरक्षा  उपलब्ध नाही. रेल्वे पोलिसांचा  शहाड स्टेशनवर दरारा नसल्याने दिवसाढवळ्या मोबाईल चोरांचा सुळसुळाट आणि वावर शहाड स्टेशनवर आहे. रेल्वे प्रशासनाने त्वरित लक्ष घालून एक कायमस्वरूपी स्टेशन मास्तर शहाड स्टेशनला द्यावा अशी मागणी  केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.