ETV Bharat / city

किरकोळ कारणावरून राबोडीत गोळीबार; दोघांना अटक - rabodi firing

किरकोळ कारणावरून दोघांनी मोहमद जैद मंजूर खान यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना राबोडीत मंगळवारी घडली.

thane cp
ठाणे पोलीस आयुक्त कार्यालय
author img

By

Published : May 26, 2021, 8:00 PM IST

ठाणे - किरकोळ कारणावरून मनात राग धरून दोघांनी मोहमद जैद मंजूर खान (३०) यांच्यावर चाकूने हल्ला करून पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना राबोडीत मंगळवारी घडली. या हल्ल्यात खान गंभीर जखमी झाले असून, गोळी चुकल्याने ते थोडक्यात बचावले आहेत. याप्रकरणी संशयित शबीर अब्दुल गौस (३०) आणि मोहन मल्लेश माचराला यांना राबोडी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न व हत्यार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

खान हे नवी मुंबईतील एका कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून काम करतात. ते त्यांचा मित्र इम्रान खान उर्फ बंटी यांच्यासोबत वास्तव्याला आहेत. त्याचाच रागशबीर याच्या मनात होता. शबीर हा खान यांना त्यांच्यासोबत राहण्यास सांगत असे. दरम्यान , मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास खान राबोडीतील रफ्तार हाऊसजवळील तपासेनगर या ठिकाणी आपल्या मित्रांसोबत बसलेले होते. त्याचवेळी शबीर त्याच्या एका साथीदारासह मोटारसायकलवरून तिथे आला. शबीरने त्यांना जखमीवर उपचार आरोपींनी केलेल्या हल्ल्यात मोहम्मद जेंद मंजूर खान हे गंभीर जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्यावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार करण्यात आले.

दुचाकीवर बसायला विरोध केल्याने हल्ला

मोटारसायकलवर बसण्याचा आग्रह धरला आणि त्याला नकार दिला म्हणून राग आल्याने शबीर आणि त्याच्या साथीदार मोहन मल्लेश माचराला यांनी खान यांना मारहाण केली. त्यानंतर शबीरच्या साथीदाराने चाकूने खान यांच्या हातावर वार केले. त्यावेळी शबीर शेख याने तूम बहोत भाई बनते हो, अभी मै तुझे जिंदा नहीं छोडूंगा असे म्हणून पिस्तूलच्या मागील बाजूने खान यांच्या डोक्यावर प्रहार केला. त्यानंतर पिस्तूलमधून एक राउंड खान यांच्या दिशेने गोळीबारही केला. मात्र गोळी चुकल्याने खान थोडक्यात बचावले. शबीर आणि त्याचा साथीदार मोहन मल्लेश माचराला मोटारसायकलने लगेच पळून गेले.आता राबोडी पोलीस या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.