ETV Bharat / city

पनवेल महापालिका क्षेत्रात २५ नवे रुग्ण, ९ जण कोरोनामुक्त होऊन परतले घरी

नवी मुंबईमध्ये आज आढळलेल्या रुग्णांमध्ये कामोठ्यातील 11, खारघरमधील 4 कळंबोलीतील 4, नवीन पनवेलमधील 3 तर आसूडगाव, रोडपाली, आणि नावडे वसाहतीतील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

Panvel Municipal Corporation
पनवेल महापालिका
author img

By

Published : May 29, 2020, 11:23 PM IST

नवी मुंबई- पनवेल महापालिका क्षेत्रात आज (शुक्रवारी) 25 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, तर 9 रूग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. दुःखद बाब म्हणजे खांदा कॉलनीतील कोरोनाबाधित महिलेचा बुधवारी (२७ मे) मृत्यू झाल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

आज आढळलेल्या रुग्णांमध्ये कामोठ्यातील 11, खारघरमधील 4 कळंबोलीतील 4, नवीन पनवेलमधील 3, तर आसूडगाव, रोडपाली, आणि नावडे वसाहतीतील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 473 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 282 रूग्ण बरे होऊन घरी परतले असून 22 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

सध्या पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाच्या 169 रुग्ण आहेत. खांदा कॉलनी, कन्हैया अपार्टमेंट येथील 47 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा बुधवारी (27 मे) मृत्यू झाला आहे. या महिलेला क्षयरोग आणि आतड्यांचा त्रास असल्याची माहिती पनवेल महापालिका प्रशासनाने दिली आहे. आज पनवेल महापालिका क्षेत्रातील 9 जण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये कामोठ्यातील 6, खारघरमधील 2 आणि कळंबोलीतील एका रुग्णाचा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.