ETV Bharat / city

कसारा घाटात ब्रेक फेल झाल्याने ट्रक दरीत कोसळला, एक ठार तर 3 गंभीर जखमी

मुंबई-आग्रा महामार्गावरील नवीन कसारा घाटात ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ट्रक खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू तर तीन जण गंभीर झाले आहे.

कसारा घाट
कसारा घाट
author img

By

Published : Aug 6, 2021, 6:04 PM IST

ठाणे - मुंबई-आग्रा महामार्गावरील नवीन कसारा घाटात ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ट्रक खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू तर तीन जण गंभीर झाले आहे. अपघातग्रस्त ट्रक नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात होता. मात्र अचानक आज पहाटे ४ वाजल्याच्या सुमारास १०० फूट खोल दरीत कोसळला. ही माहिती आपत्ती व्यवस्थापन टीमला मिळताच भरपावसात घटनास्थळी धाव घेऊन अथक प्रयत्नाने गंभीर जखमी असलेल्या ३ जणांना सुखरूप बाहेर काढले तर १ जणाचा जागीच मृत्यू झाल्याने सदर मृतदेह कसारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे.

कसारा घाटात ब्रेक फेल झाल्याने ट्रक दरीत कोसळला, एकाचा ठार तर 3 गंभीर जखमी

सकाळी ७ वाजेपर्यत सुरु होते मदतकार्य
आज पहाटे चार वाजल्याच्या सुमारास महामार्ग पोलीस पथक घोटी व कसारा पोलीस ठाण्यात ट्रक क्र. एमएच -०४, जीयु- ७५९२ हा ट्रक कसारा घाटाच्या दरीत कोसळला याची माहिती मिळाली. त्यांनतर आपत्ती व्यवस्थापन टीमचे शाम धुमाळ, मनोज मोरे, दत्ता वाताडे, अक्षय राठोड, देवा वाघ, विनोद आयरे, लक्षमण वाघ, जस्सीभाई, बाळू मागे हे पथक नाशिक मुंबई घाटात रेस्क्यू साहित्य घेऊन घटनास्थळी पोहचलो. घटनस्थळी पोहचताच टीमच्या सदस्यांनी घाटात उतरून सर्वात आदी ४ जणांपैकी एकाला दरीतून बाहेर काढून पीकइन्फ्रा पेट्रोलिंग टीमने जखमीला रुग्णालयात रवाना केले. तर दुसऱ्या जखमीला पोलिसांच्या मदतीने दरीतून वर काढत रुग्णवाहिकेतून हॉस्पिटल रवाना केले. हे मदत कार्य सकाळी ७ वाजेपर्यंत सुरु होते.

..अशातही घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन टीम
घाटाच्या दरीत कोसळलेल्या ट्रकमधील दोघा जणांच्या अंगावर ट्रकमधील सिमेटचे ब्लॉक पडल्याने एकाचा मृत्यू झाला होता. त्यातच अंधार व पाऊस आणि निसरडा रस्ता यामुळे दरीत उतरण्यास अडचणी येत होत्या. अशातही घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन टीम गेली व त्यापैकी एका जखमीला बाहेर आणेल. मात्र दुसरा ट्रक खाली दबून मृत अवस्थेत आढळून आला. मृतदेह दरीतून वर आणण्यासाठी व्यवस्थापन टीम, पींक इन्फ्रा टीम, कसारा पोलीस, महामार्ग पोलीस, अशी साखळी तयार करून मृतदेह वर काढला व कसारा आरोग्य केंद्रात उत्तरणीय तपासणीसाठी रवाना केला.

हेही वाचा - breaking : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील शैक्षणिक संस्थेवर ईडीकडून छापेमारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.