ETV Bharat / city

बनावट चावीने घरात घुसून २३ तोळे सोने लंपास करणाऱ्या तिघा सख्ख्या बहिणींना बेड्या - sisters arrested for stealing gold in dombivli

बनावट चावीने घराचे कुलूप उघडून २३ तोळे सोने लंपास करणाऱ्या तीन सख्ख्या बहिणींचा कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने घरफोडीचा प्रकार उघडकीस आणला आहे. विशेष म्हणजे, डोंबिवली पूर्वेकडील एका बंद घरात २३ तोळे चोरी करून या तिघी बहिणी आपल्या कुटुंबासह जेजुरी येथे देवदर्शनासाठी गेल्या होत्या.

sisters arrested for stealing gold in thane
अटक आरोपी
author img

By

Published : Jun 12, 2022, 9:47 AM IST

ठाणे - बनावट चावीने घराचे कुलूप उघडून २३ तोळे सोने लंपास करणाऱ्या तीन सख्ख्या बहिणींचा कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने घरफोडीचा प्रकार उघडकीस आणला आहे. विशेष म्हणजे, डोंबिवली पूर्वेकडील एका बंद घरात २३ तोळे चोरी करून या तिघी बहिणी आपल्या कुटुंबासह जेजुरी येथे देवदर्शनासाठी गेल्या होत्या. पोलीस पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेत पुणे जिल्ह्यातील जेजुरीमध्ये तिन्ही बहिणींना बेड्या ठोकल्या. सारिका सकट, मिणा इंगळे आणि सुजाता सकट अशी अटक केलेल्या तिन्ही बहिणींची नावे आहेत.

माहिती देताना पोलीस अधिकारी

हेही वाचा - Thane Crime News : भावजयच्या साडे सहा लाखांच्या दागिन्यांवर नणंदने मारला डल्ला

सीसीटीव्ही फुटेजमुळे तिघींचा शोध - डोंबिवली पूर्व रामनगर परिसरात चैताली शेट्टी कुटुंबासह राहतात. २ जून रोजी काही कामानिमित्ताने घराला कुलूप लावून त्या बाहेर गेल्या होत्या. हीच संधी साधून या तिघांनी बनावट चावीने दरवाजा उघडून घरातील २३ तोळे सोन्याचे दागिने चोरले होते. या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पोलीस पथकाने इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजची तपासणी केली असता चोरी करणाऱ्या तीन महिला कॅमेऱ्यात कैद झाल्याचे दिसून आले. याच सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या तिन्ही महिलांचा शोध सुरू केला.

शिवाय गुन्हे शाखेच्या पथकाने डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता त्यांना या महिला स्टेशनहून ट्रेनने मुंबईच्या दिशेने गेल्याचे दिसून आले. पुढे पोलिसांनी प्रत्येक रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही तपासले असता घाटकोपर येथे महिला उतरल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले. या तिन्ही महिला मानखुर्द आणि कुर्ला परिसरातील असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या तिन्ही महिलांचा शोध सुरू केला.

जेजुरीत रचला पोलिसांनी सापळा - कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांना या तिन्ही महिला सहकुटुंब जेजुरीला देवदर्शनासाठी गेल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोहन कळमकर, पोलीस नाईक विनोद चनने, पोलीस कर्मचारी अनुप कामत यांच्या पथकाने तत्काळ जेजुरी येथे सापळा रचत या तिन्ही महिलांना अटक केली आहे.

२३ तोळे दागिने जप्त - पोलिसांनी महिलांकडून चोरीचे २३ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या तिघी कधीपासून चोऱ्या करत आहेत आणि अजून किती ठिकाणी अशा प्रकारच्या चोऱ्या केल्या आहेत, याचा तपास पोलीस करत आहे. दरम्यान, या आधी त्यांच्या विरोधात मुंबई-ठाणे परिसरातील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.