ठाणे : अंगावर रंगाचा फुगा फेकून मारल्याचा ( Paint Balloon Thrown ) जाब विचारताना झालेल्या वादातून १६ वर्षीय विध्यार्थाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली ( Student Beaten In Thane ) आहे. ही घटना उल्हासनगर शहरातील राधा वाईन्स जवळील रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात ( Madhyavarti Police Station Thane ) अज्ञात हल्लेखोराविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.
कोचिंग क्लासेसवरून घरी जाताना घडला प्रकार..
होळीच्या दिवशी हा विद्यार्थी कोचिंग क्लासेसवरून घरी परतत होता. त्यावेळी उल्हासनगर मधील राधा वाईन्सजवळ काही टवाळखोर तरुण नागरिकांच्या अंगावर पाण्याने भरलेले फुगे मारत होते. त्यावेळी एका टवाळखोराने त्याच्या अंगावरही फुगा मारला होता. त्यानंतर फुगा मारणे बंदी असून, तुम्ही का मला फुगा मारला असा जाब विचारण्यासाठी तो गेला. त्यावेळी अचानक त्या टवाळखोर तरुणांनी विद्यार्थ्यालाच बेदम मारहाण केली. यात विद्यार्थ्यांच्या डोळ्याखाली गंभीर स्वरूपाची इजा झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
हल्लेखोर चकवा देऊन पोलीस ठाण्यातून पसार..
या घटनेनंतर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या टवाळखोर तरुणाला आणून बसवले होते. परंतु त्याठिकाणावरून पोलिसांना चकवा देऊन तो पसार झाला. आरोपी ताब्यात असताना फरार झाल्याने पोलिसांनी अज्ञात हल्लेखोर विरोधात गुन्हा दाखल केला. मात्र या प्रकारामुळे विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलिसांच्या विरोधात नाराजगी व्यक्त केलीय.