ETV Bharat / city

कोरोनाची दुसरी लाट डिसेंबर अखेरीस येण्याची शक्यता.. आरोग्य मंत्री राजेश टोपे - कोरोनाची दुसरी लाट

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात राज्यातील आरोग्य यंत्रणेने यश मिळवले आहे. मात्र मात्र डिसेंबर अखेरीस राज्यात दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे प्रत्येकाने सतर्कता बाळगणे आवश्यक आहे, असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

second wave of corona
आरोग्य मंत्री राजेश टोपे
author img

By

Published : Nov 10, 2020, 3:37 PM IST

Updated : Nov 10, 2020, 4:19 PM IST

ठाणे - एकेकाळी कल्याण डोंबिवली कोरोनाचं हॉटस्पॉट होतं, परंतु आता कल्याण डोंबिवलीतील अॅक्टिव केसेस खूप कमी असून महापालिका प्रशासनाने कोरोनावर उत्तम नियंत्रण मिळवलं आहे. मात्र डिसेंबर अखेरीस राज्यात दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाने मास्क परिधान करणे व सोशल डिस्टंसिंग पाळणे अत्यावश्यक असल्याचे मत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महापालिका मुख्यालयातील आयुक्त दालनात आयोजित पत्रकार परिषदेत केले. तत्पूर्वी मंत्री राजेश टोपे यांनी महापालिकेने नुकत्याच सुरु केलेल्या लाल चौकी आर्ट गॅलरी येथील कोविड समर्पित रुग्णालयाची पाहणी केली.

आरोग्य मंत्री राजेश टोपे
मुंबईप्रमाणेच केडीएमसी क्षेत्रात मेडिकल कॉलेज-हॉस्पिटल उभारणार -

महापालिकेत शासनाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी नसल्याने एक उत्तम वैद्यकीय आरोग्य अधिकारी उपलब्ध करुन देणेबाबत निर्देश त्यांनी उपस्थित असलेल्या ठाणे जिल्हा आरोग्य उपसंचालक डॉ. गौरी राठोड यांना दिले. महापालिकेत फिजीशियन कमी असल्याने तेही देण्याची व्यवस्था करु अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. ठाणे जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी स्वतंत्र आरोग्य संचनालयाला शासनाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. नुकतेच प्रशासनाने सादर केलेल्या पीपीपी तत्वावर हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजच्या प्रस्तावास महासभेने मंजुरी दिली आहे, या संकल्पनेचे आरक्षित भुखंडावर पीपीपी तत्वावर रुग्णालय व मेडिकल कॉलेज उभारण्यास शासन सहाय्य करेल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले, पण गरीब लोकांना सवलतीत आरोग्य सेवा देणे संबंधित विकासकास बंधनकारक राहील, असेही ते यावेळी म्हणाले. साथीच्या रोगासाठी ठाणे परिसरात लवकरच साथरोग रुग्णालय उभे राहणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

Last Updated : Nov 10, 2020, 4:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.