ठाणे - अंबरनाथ रेल्वे स्थानकावरील टीसीच्या कार्यालयात विना तिकीट प्रवास करणाऱ्या ५ जणांची तक्रार करायला गेलेला फिर्यादीच बोगस डॉक्टर असल्याचे रेल्वे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे. (Bogus Doctor Case In Thane ) याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून रेल्वे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. विक्की गोपीनाथ इंगळे असे अटक केलेल्या बोगस डॉक्टरचे नाव आहे.
डॉक्टरची उपकरणे जप्त केली - यावेळी तुम्हाला तिकीट तपासणी करण्याचा काय अधिकार आहे. असे अंबरनाथ रेल्वे स्थानकातील टीसी कार्यालयातून त्याला विचारण्यात आले. त्यानंतर त्या बोगस डॉक्टराने मी रेल्वे मध्ये मेडिकल ऑफिसर असल्याचे सांगितले. मात्र, तो यावेळी गांगरल्याचे निदर्शनास आले. त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडे डॉक्टर असल्याचे ६ बोगस सर्टिफिकिट आढळून आले. शिवाय त्याच्याकडे मेडिकलची काही उपकरणे सापडली. विशेष म्हणजे या बोगस डॉक्टरने केवळ रेल्वे भाडे वाचविण्यासाठी केल्याचे सांगतो. मात्र, लोहमार्ग पोलिसांना त्याच्यावर अधिक संशय बळावल्याने त्याला अटक करून त्याच्याकडील डॉक्टरची उपकरणे जप्त केली असून पुढील तपास रेल्वे पोलीस करत आहेत.
हेही वाचा - Nitin Gadkari Meet With Raj Thackeray : केंद्रीय मंत्री भाजप नेते नितीन गडकरी राज ठाकरेंच्या भेटीला