ETV Bharat / city

Two-Wheeler Theft In Thane : पत्नीला दुचाकीवरून फिरण्याचा तर, पतीला दुचाकी चोरीचा छंद - दुचाकी चोराला मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले

दिपकने एका तरुणीशी नुकताच प्रेमविवाह केला होता. मात्र, तिला दुचाकीवरून फिरण्याचा छंद असून तिला मौजमजा करण्याची इच्छा पतीकडे बोलून दाखवली. (Two-Wheeler Theft In Thane ) त्यानंतर त्याने दुचाक्या लंपास करण्याचे ठरवून त्याने सहा जणांची टोळी तयार केली. त्यानंतर तो दुचाकींची चोरी करत होता. त्याच्यासह त्याच्या साथीदारांना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतेले आहे.

पकडलेल्या टोळीसह गाड्या
पकडलेल्या टोळीसह गाड्या
author img

By

Published : Dec 24, 2021, 8:05 AM IST

Updated : Dec 24, 2021, 1:36 PM IST

ठाणे - प्रेमविवाह केल्यानंतर पत्नीला खुश ठेवण्यासाठी पैसे कमावायचे म्हणून पतीने चक्क दुचाकी चोरण्याचा मार्ग निवडला. दरम्यान, या इसाचा हा व्यवहार (Two-Wheeler Theft In Thane ) उघड झाल्यानंतर मानपाडा पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून आतापर्यत १९ दुचाकी जप्त केल्या आहेत. तर भंगारात विकलेल्या २३ दुचाकींचे काही पार्ट मिळून अशा सुमारे ४८ दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. यासासोबत त्याच्या 5 साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (The Husband Earning Money by Stealing a Bike) दीपक सलगरे (रा. पालेगाव अंबरनाथ ) असे यातील म्होरख्याचे नाव आहे. तर राहुल डावरे, चौहान उर्फ बबलू , धर्मदेव चौहान, समशेर खान , भैरवसिंग खरवड अशी त्याब्यात घेतलेल्यांची नावं आहेत.

माहिती देताना पोलीस अधिकारी

चोरीच्या दुचाकी विक्री, काही भंगारात

दिपकने एका तरुणीशी नुकताच प्रेमविवाह केला होता. मात्र, तिला दुचाकीवरून फिरण्याचा छंद असून तिला मौजमजा करण्याची इच्छा पतीकडे बोलून दाखवली. (Two-Wheeler Theft In Manpada) त्यानंतर त्याने दुचाक्या लंपास करण्याचे ठरवून त्याने सहा जणांची टोळी तयार केली. त्यावेळी आरोपीने बाजारपेठ, अंबरनाथ , उल्हासनगर, डायघर, भिवंडी मानपाडा, कल्याण अशा विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध परिसरातून दुचाकी लंपास करण्याचा सपाटा लावला होता. लंपास केलेल्या दुचाकी डोंबिवली नजीक पलावा येथे राहणारा त्याचा साथीदार राहुलला विक्री करणे किंवा भंगारवाल्याकडे देऊन त्याचे पार्ट काढून त्यांची कमी दरात विक्री करणे अशापद्धतीचे गुन्हे तो आणि त्याचे साथीदार करीत होते.

सीसीटीव्ही फुटेजमुळे दुचाकी चोरांच्या टोळीचा पर्दाफाश

दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांनी तपास करून ज्या परिसरातून दुचाकी चोरीला जात होती. त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पोलीस पथकाने पाहणी केली. शिवाय भंगाराचे दुकानदार यांचेवरही निगरानी ठेवत आरोपींच्या हालचालीवर पाळत ठेवून, तांत्रिक विश्लेषण व खबऱ्यामुळे चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेसाठी अहोरात्र सर्वोतोपरी प्रयत्न मानपाडा पोलीस पथकांकडून सुरु होते. त्यातच एका सीसीटीव्ही फुटजेमध्ये आरोपी दुचाकी लंपास करताना दिसला.

८ लाख २४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

आरोपीकडून आतापर्यत १९ दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत. तसेच, ४० हजार रुपये रोख शिवाय २३ दुचाकीचे इंजिन नंबर असलेले पार्ट २८ इतर इंजिन पार्ट, १२ मॅकव्हिल व एक कटर मशिन असा एकूण ८ लाख २४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. दुचाकी विकत घेणाऱ्या सामान्य ग्राहकांनी आधी कागदपत्रांची पडताळणी करावी आणि त्यानंतर दुचाकी खरेदी करावे अन्यथा चोरीच्या दुचाकी खरेदी केल्याचा गुन्हा सामान्य ग्राहकांवर दाखल करण्यात येईल अशी माहिती पोलीस उपाआयुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली आहे.

हेही वाचा - शक्ती कायदा विधानसभेत एकमताने मंजूर; या कायद्याने काय होणार? वाचा..

Last Updated : Dec 24, 2021, 1:36 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.