ठाणे - तंत्रज्ञानाचा आधार घेऊन न्यायालयातील खटले लढवले पाहिजेत. आपण कर्नाटक येथे नियुक्त असताना कोरोना काळात तंत्रज्ञानाचा वापर करून न्यायदान केले. दरम्यान, यामध्ये वकिलांना काम करताना अनेक मर्यादा असतात. मात्र, या मर्यादा न्यायाधीशांना नसतात. त्यांना विवेकबुद्धी आणि कायद्याच्या चौकटीत राहून न्यायदान करता येते हा महात्वाचा फरक आहे असे मत न्यायाधीश अभय ओक यांनी वक्त केले. ते ठाणे येथील आयोजीत कार्यक्रमात बोलत होते.
वैज्ञानिक डॉक्टर हेमचंद्र प्रधान यांच्या हस्ते ओक यांचा सन्मान
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांचा येथील मो.ह. विद्यालयात सत्कार करण्यात आला. ओक यांची नुकतीच सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर हा सत्कार आयोजीत करण्यात आला होता. ओक या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. दरम्यान, येथील माजी विद्यार्थी आणि वैज्ञानिक डॉक्टर हेमचंद्र प्रधान यांच्या हस्ते ओक यांचा सन्मान करण्यात आला.
तर कायद्याच्या चौकटीत दिलेला खटल्याचा निकाल हा न्याय असतो
जिल्हा आणि तालुका स्तरावर पक्षकारांचे भवितव्य घडत किंवा बिघडतं असते. त्यामुळे या न्यायालयांमध्ये खरं कामकाज चालते. खटल्याच्या ओघात न्यायाधीशांनी केलेली विधाने हा न्याय नसतो, तर कायद्याच्या चौकटीत दिलेला खटल्याचा निकाल हा न्याय असतो असही न्यायाधीश ओक यावेळी म्हणाले आहेत. यावेळी एम. एच. हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र राजपूत उपस्थितीत होते. शालेय समितीचे अध्यक्ष शैलेश साळवी अध्यक्षस्थानी होते. त्यावेळी न्यायाधीश ओक यांच्याशी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय मं. गो, अँड. संजय बोरकर, ज्येष्ठ पत्रकार दिनकर गांगल, प्रकाश बाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा - प्रबोधनकार ठाकरे यांचे ग्रंथ साहित्य आजही समर्पक आणि मार्गदर्शक - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे