ठाणे - देशभरात मोठ्या अभिमानाने स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. मात्र, ठाण्यातील ठाण्याचा राजा गोविंदा पथकाने आगळ्यावेगळ्या थाटात हा देशाचा सण साजरा केला आहे. पथकाने रात्री 12 वाजता गोविंदांचे ५ थर उभारुन तिरंगा फडकवला आहे. तसेच सामुहीक राष्ट्रगीतही गायले.
काही दिवसांवरच दहिहंडी सण आला आहे. अशातच अनेक गोविंदा पथक सराव करत आहेत. मात्र, ठाण्याच्या या गोविंद पथकाने यावेळेस स्वातंत्र्य दिन थरारक आणि वेगळ्या पद्धतीने करायचे ठरवले. त्यासाठी मोठ्या मेहनतीने सराव करुन हा मनोरा साकारला. या उपक्रमाचे ठाणेकरांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.