ठाणे - गेले अनेक दिवस ठाणेकरांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यात आता ठाण्याचा विदर्भ होतोय की काय असे वातावरण सध्या दिसून येत आहे. त्याचविरोधात महापालिका मुख्यालयासमोर भाजप आणि कोपरीतील महिलांच्या वतीने हंडा मोर्चा काढण्यात आला. यावेळी महापालिकेसमोर मातीचे हांडे देखील फोडण्यात ( Bjp Agitation Against Thane Corporation ) आले.
ठाण्यातील कोपरी भागात गेले 6 ते 7 महिन्यापासून पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. याबाबत आक्रमक होत आज ( 6 मे ) कोपरी भागातील महिलांनी पालिका मुख्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात आला. यावेळी महिलांनी पालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत निषेध करत मातीचे हांडे फोडले.
कोपरात गेल्या 6 महिन्यांपासून पाणी प्रश्न गंभीर आहे. माजी महापौर असलेल्या नरेश म्हस्के यांच्या प्रभागात पाणी येते. मात्र, शेजारीच असणाऱ्या कोपरी भागात पाणी येत नाही. हा भेदभाव का केला जातो, असा प्रश्न भाजप आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरेंनी उपस्थित केला. मोर्चा काढूनही प्रशासनाला जाग येत नाही. आज हंडा पालिकेसमोर फोडला आहे. मात्र, पुढच्या वेळी कुठे फुटेल हे लक्षात घ्या, असा इशारा महिलांनी प्रशासनाला दिला आहे.
अनेक आंदोलन - ठाण्यात असलेल्या पाणी समस्येवरून आतापर्यंत भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसकडून अनेक आंदोलन झाली. पण, पाण्याची अडचण सुटेना. जोपर्यंत पालिकेचे स्वतःचे धरण होत नाही, तोपर्यंत ही समस्या सुटणार नाही, असे जाणकार सांगत आहेत.
हेही वाचा - Pravin Darekar : प्रवीण दरेकरांचा 'या' प्रकरणावरुन ठाकरे सरकारवर हल्लाबोल; म्हणाले...