ETV Bharat / city

गँगस्टर रवी पुजारीला ठाणे पोलिस घेणार ताब्यात, खून खंडणी सारख्या 6 गुन्ह्यात होता वॉन्टेड - ठाणे पोलिसबद्दल बातमी

गँगस्टर रवी पूजारीला ठाणे पोलीस ताब्यात घेणार आहेत. खून खंडणी सारख्या 6 गुन्हात तो वॉन्टेड होता.

Thane police to arrest gangster Ravi Pujari
गँगस्टर रवी पुजारीला ठाणे पोलिस घेणार ताब्यात, खून खंडणी सारख्या 6 गुन्ह्यात होता वॉन्टेड
author img

By

Published : Mar 2, 2021, 4:53 PM IST

Updated : Mar 2, 2021, 5:34 PM IST

ठाणे - विदेशात बसून भारतातल्या मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली परिसरातील बिल्डर आणि व्यापाऱ्यांना खंडणीसाठी फोन करून करोडो रुपयांची खंडणी गोळा करण्याचा प्रकार करणारा गँगस्टर रवी पुजारी हा लवकरच ठाणे पोलिसांच्या कोठडीत दिसणार आहे. कर्नाटक पोलिसांनी रवी पुजारी ला सेनेगल मधून मागच्या वर्षी अटक केले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी रवी पुजारी वर असलेल्या गुन्ह्यांमध्ये रवी पुजारी ला ताब्यात घेतले, अशात ठाण्यात नवी मुंबईत आणखीनही गुन्हे प्रलंबित आहेत. ठाण्यातला जवळपास 30 गुन्ह्यामध्ये रवी पुजारी वॉन्टेड आहे. त्यापैकी सहा मोठ्या गुन्ह्यांमध्ये ठाणे पोलिस आता रवी पुजारी ला ताब्यात घेणार आहेत.

गँगस्टर रवी पुजारीला ठाणे पोलिस घेणार ताब्यात, खून खंडणी सारख्या 6 गुन्ह्यात होता वॉन्टेड

ठाणे पोलिसांनी सेनेगल मधल्या न्यायालयात रवी पुजारीच्या सहा गुन्ह्यांसाठी फ्रेंच भाषेमध्ये अर्ज दाखल केले. अशावेळी मुंबई आणि ठाण्यातील अशा पंधरा गुन्ह्यांमध्ये सेनेगल न्यायालयातून रवी पुजारीचा ताबा घेण्याची परवानगी पोलिसांना मिळाली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत 2011साली एका बिल्डरवर झालेल्या गोळीबार प्रकरणात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे, या आणि आणखी पाच गुण्यामध्ये ठाणे पोलिसांना रवि पुजारीचा ताबा मिळणार आहे.

दोन कोटी दे नाहीतर गोळ्या घालीन -

ठाण्यातील व्यवसायिक राकेश भगत याला 15 फेब्रुवारी 2018ला ऑस्ट्रेलिया वरून रवी पुजारीने फोन करून दोन कोटी दे नाहीतर गोळ्या घालीन अशी धमकी दिली होती. याबाबत दाखल झालेल्या गुन्ह्यातचा तपास ठाणे पोलिस करत आहेत. या मध्ये देखील रवी पुजारीला पोलीस ताब्यात घेणार आहेत.

भाजप आमदाराला देखील दिली होती धमकी -

रवी पुजारीने होस्टेल मधून फोन करून कल्याणचे आमदार गणपत गायकवाड यांनादेखील फोनवर खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी दिली होती. हा देखील गुन्हा ठाण्यात घडला आहे.

हवालामार्फत जात होता पैसा -

रवी पुजारीच्या कार्यपद्धतीचा पोलिसांनी तपास केला असता खंडनीतून मिळालेला पैसा हवालामार्गे देशाच्या बाहेर जात होता आणि त्यासाठी रवी पुजारी एक विशिष्ट युक्ती वापरत होता. बांधकाम व्यवसायिक व्यापारी यांचे फोन नंबर मिळवून ते रवी पुजारी ला दिले जायचे आणि त्यानंतर रवि पुजारी त्यांना फोन करून धमकी द्यायचा. या आणि अशाच काही प्रकरणात त्यांनी खंडणीसाठी खून देखील केले आहेत. असाच एका प्रकारचा फोन उल्हासनगरमध्ये देखील आलेला होता.

Last Updated : Mar 2, 2021, 5:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.