ठाणे - 1990 चा काळ हा एकनाथ शिंदे यांच्यासाठी खडतर होता, या काळामध्ये एकनाथ शिंदे यांना कुटुंब चालवण्यासाठी मेहनत करावी लागली होती, ही मेहनत एकनाथ शिंदे यांनी ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करून केली. त्या काळापासून आजपर्यंत त्यांचे मित्र कायम त्यांच्या सोबत आहेत त्यांच्या मित्रांची भूमिका ही कालही त्यांच्यासोबत होती, आजही आहे आणि भविष्यातही त्यांच्यासोबतच राहू अशी भूमिका त्यांनी, हा व्यवसाय करताना जपलेले संबंध शिंदे यांनी ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करताना दररोज हजारो लोकांची संपर्क येत असल्याने त्यांनी जे संबंध जपले हे संबंध आजही आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आम्हाला त्यांना मुख्यमंत्री पदावर पाहायचे आहे. अशी प्रतिक्रिया त्यांच्या जुन्या मित्रांनी दिली आहे. ( Eknath Shinde Old Friends )
शिंदेना मुख्यमंत्री झालेले पाहायचेय - महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आजच्या घडीला एवढे मोठे नेतृत्व असताना देखील आजही या व्यवसायातले त्यांचे मित्र त्यांना अडचणीला फोन करतात. एकनाथ शिंदे नेहमीप्रमाणे त्यांच्या मदतीला धावून देखील येतात. अशा अनेक आठवणी त्यांच्या मित्रांनी सांगितल्या. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झालेले पाहायचा आहे, अशी भावना देखील व्यक्त केली आहे. ठाण्यातल्या वागळे इस्टेट परिसरात मधल्या वागळे स्टेट ट्रक लॉरी असोसिएशनच्या कार्यालयाच्या बाहेर आजही एकनाथ शिंदे जिंदाबादचे नारे लागतात. कारण एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मित्रासाठी केलेली मदत असेल अडचणीत केलेली कामे असतील. ते आजही त्यांच्या मित्रांना आठवतात. ते या आठवणीमुळेच आपली मैत्री किती समाधानकारक आहे, हे अभिमानाने सांगतात. याच वागळे परिसरातून आढावा घेतलेला आहे ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधी....
हेही वाचा - BMC Shivsena Corporator : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर मुंबईतील शिवसेना नगरसेवकांमध्ये खळबळ!
हेही वाचा - शिवसेनेचे पारडे आकड्यांच्या जिवावर जड, शिंदे गटाला फटका बसण्याची शक्यता