ETV Bharat / city

स्वातंत्र्यदिनी चीनमध्ये फडकवला तिरंगा; ठाण्यातील महिला पोलिसाची रौप्य कामगिरी - Sunita Ousekar win silver medal in World Police and Fire Games

ठाण्यातील महिला पोलीस कर्मचारी सुनीता औसेकर यांनी भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच चीनमध्ये जागतिक पोलीस आणि फायर गेम्समध्ये रौप्य पदक पटकावले.

सुनीता औसेकर यांची जागतिक पोलीस आणि फायर गेम्समध्ये रौप्य पदकाची कामगिरी
author img

By

Published : Aug 23, 2019, 9:26 AM IST

Updated : Aug 23, 2019, 10:04 AM IST

ठाणे - सुनीता औसेकर या ठाण्यातील महिला पोलीस कर्मचारी यांनी चीनमधील चेंगडू शहरात संपन्न झालेल्या जागतिक पोलीस आणि फायर गेम्समध्ये रौप्य पदकाची कामगिरी केली. याबद्दल औसेकर यांचा ठाणे नगर पोलिसांकडून सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच आपण देशाचा झेंडा चीनमध्ये फडकावू शकलो याचा अभिमान वाटतो, असे औसेकर म्हणाल्या आहेत.

स्वातंत्र्यादिनीच "तीने" चीनमध्ये तिरंगा फडकवला..ठाण्याच्या महिला पोलीसाची रौप्य कामगिरी

चीनमध्ये तिरंगा फडकावून अन् राष्ट्रगीत गाऊन वाढवली देशाची शान...

चीन तसा भारताचा परंपरागत शत्रू पण याच चीनच्या छाताडावर ऐन स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच ठाण्यातील महिला पोलीस कर्मचारी सुनीता औसेकर हिने तिरंगा फडकावून इतिहास घडवला. चीनमधील चेंगडू शहरांत संपन्न झालेल्या जागतिक पोलीस आणि फायर गेम्समध्ये जगातील तब्बल 70 देशाच्या स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यात सहभागी झालेल्या भारतीय संघाने 15 ऑगस्ट या आपल्या स्वातंत्र्य दिवशी मैदानावरच झेंडा फडकावून राष्ट्रगीत गाऊन मानवंदना दिली. यातून स्फूर्ती घेत त्याच दिवशी सायंकाळी झालेल्या 5 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत सुनीता हिने रजत पदक पटकावले.

ठाणे नगर पोलीस स्थानकातील सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने औसेकर यांचा सत्कार करण्यात आला. "सकारात्मक भाव आणि काहीतरी करण्याची जिद्द यामुळेच औसेकर यांनी हे यश संपादित केले", असे ठाणे नगर पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी यांनी म्हटले आहे. आपले कर्तव्य बजावत असताना वरिष्ठांनी आपल्याला सरावासाठी वेळ उपलब्ध करून दिल्याबद्दल सुनीता औसेकर यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या वरिष्ठांना दिले. तसेच 2021 साली नेदरलँड्समध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी आपण आत्तापासूनच तयारीला लागल्याचे त्यांनी सांगितले.

Intro:स्वातंत्र्या दिवशी फडकवला चीन मध्ये तिरंगा.. राष्ट्रगीत गाऊन ठाणे महिलेने वाढवली देशाची शानBody:
चीन तसा भारताचा परंपरागत शत्रू पण याच चीनच्या छाताडावर ऐन स्वातंत्र्या दिवशीच ठाण्यातील महिला पोलीस कर्मचारी सुनीता औसेकर हिने तिरंगा फडकावून इतिहास घडवला. चीन मधील चेंगडू शहरांत संपन्न झालेल्या जागतिक पोलीस आणि फायर गेम्स मध्ये जगातील तब्बल 70 देशाच्या स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यात सहभागी झालेल्या भारतीय संघाने 15 ऑगस्ट या आपल्या स्वातंत्र्या दिवशी मैदानावरच झेंडा फडकावून राष्ट्रगीत गाऊन मानवंदना दिली. यातून स्फूर्ती घेत त्याच दिवशी सायंकाळी झालेल्या 5
किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत सुनीता हिने रजत पदक पटकावले. या स्पर्धेमुळे आलेल्या थकव्याने तिचे दुसऱ्या दिवशीच्या किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेचे पदक अवघ्या काही सेकंदांनी हुकले. या शर्यतीत तिने पाचवा क्रमांक पटकावला ठाणे नगर पोलीस स्थानकात आपले कर्तव्य बजावत असताना वरिष्ठांनी आपल्याला सरावासाठी वेळ उपलब्ध करून दिल्या बद्दल तिने आपल्या यशाचे श्रेय आपल्या वरिष्ठांना दिले. 2021 साली नेदरलँड्स मध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी आपण आत्तापासूनच तयारीला लागल्याचे त्यांनी सांगितले.
सकारात्मक भाव आणि काहीतरी करण्याची जिद्द यामुळेच त्यांनी हे यश संपादित केल्याचे सांगत ठाणे नगर पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी यांनी सुनीता चे तोंडभर कौतुक केले. खेळ आणि पोलीस दलातील आपले कर्तव्य बजावताना तिने कायम समन्वय साधल्याने तिला he यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तिच्या या जबरदस्त कामगिरीने आम्हा सर्वाना अत्यानंद झाला असून तिने अशीच उत्तरोत्तर प्रगती करावी अशा शुभेच्छा त्यांनी सुनीता हिला दिल्या.

BYTE - सुनीता औसेकर (पदक विजेती महिला पोलीस)Conclusion:
Last Updated : Aug 23, 2019, 10:04 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.