ETV Bharat / city

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात जागावाटपावरून युतीत रस्सीखेच

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपची युती होणार असल्याचे संकेत मिळत असले तरी, अंबरनाथ विधानसभेच्या जागावाटपावरून युतीत रस्सीखेच होण्याचीही चिन्हे दिसत आहेत.

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ
author img

By

Published : Sep 16, 2019, 7:13 PM IST

ठाणे - शिवसेनेकडे असलेल्या अंबरनाथ विधानसभा मतदारसंघावर भाजपने दावा करण्यास सुरुवात केली आहे. जागांच्या अदलाबदलीमध्ये शिवसेनेने ही जागा भाजपला द्यावी, अशी मागणी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली आहे. तर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी भाजपच्या मागणीला विरोध केल्याचे पाहायला मिळत आहे.

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ : जागावाटपावरून युतीत रस्सीखेच

हेही वाचा... विधानसभा 2019 : काँग्रेस-राष्ट्रवादीचं ठरलं; प्रत्येकी 125 जागा लढवणार

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे बालाजी किणीकर हे विद्यमान आमदार आहेत. सन २००९ मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेनंतर अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. तसेच बदलापूर व लगतचा काही भाग वगळून उल्हासनगरचा काही भाग या मतदारसंघात जोडण्यात आला. या निवडणुकीत शिवसेनेने डॉ. बालाजी किणीकर यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत स्थानिक उमेदवार हा मुद्दा प्रभावी ठरल्याने बालाजी किणीकर यांना सहजपणे विजय मिळवणे शक्य झाले. त्यानंतर झालेल्या २०१४ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती न झाल्याने भाजपनेही उल्हासनगर महानगरपालिकेतील नगरसेवक राजेश वानखेडे यांना मैदानात उतरवले. या निवडणुकीत बालाजी किणीकर विजयी झाले आणि वानखेडे यांचा अवघ्या २०४१ मतांनी पराभव झाला. त्यामुळे स्वाभाविकच यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या आशा पल्लवित झाल्या असून, अंबरनाथ विधानसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यातूनच आता भाजपा शिवसेनेच्या अंबरनाथ मतदारसंघावर दावा करू लागली आहे.

हेही वाचा... नेवासा विधानसभा मतदारसंघ: तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी?

अलीकडेच अंबरनाथमध्ये शहराध्यक्ष भरत फुलोरे यांनी आयोजित केलेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत अंबरनाथ विधानसभेची जागा भाजपाला मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. भरत फुलोरे यांच्यासह ठाणे विभागीय उपाध्यक्ष किसन तारमळे, कृष्णा रसाळ-पाटील, पूर्णिमा कबरे, तुळशीराम चौधरी, सलीम चौधरी, संतोष शिंदे या कोअर कमिटी सदस्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील या निर्णयाची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

हेही वाचा... विधानसभा निवडणूक 2019 : मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात शिवसेनेचा उमेदवार ?

अंबरनाथ मतदारसंघ १९९० पासून भाजपचा बालेकिल्ला होता. त्याकाळी रामभाऊ कापसे, जगन्नाथ पाटील आदींनी अंबरनाथ मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. यानंतर शिवसेना भाजपतील अंतर्गत तडजोडीमुळे अंबरनाथ शिवसेनेला देण्यात आले होते. तेव्हापासून अंबरनाथ मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आणि खासदार प्रतिनिधित्व करत आहेत. मागील निवडणुकीत शिवसेना-भाजप युती न झाल्याने भाजपचे उमेदवार राजेश वानखेडे यांचा निसटता पराभव झाला. यंदा भाजपकडून सात उमेदवार इच्छुक असल्याचे पूर्णिमा कबरे यांनी सांगितले. येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यात काही ठिकाणी उमेदवारांची अदलाबदल होणार आहे. या बदलामध्ये अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचा समावेश करून भाजपला अंबरनाथची जागा सोडावी, अशी मागणी कोअर कमिटीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आल्याचे या वेळी सांगण्यात आले.

हेही वाचा... कोण होणार खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचा कारभारी? चौरंगी लढतीने येणार रंगत

भाजपची ताकद वाढली...

अंबरनाथ तालुक्यासह नगरपालिकेमध्ये भाजपाची ताकद वाढली असून, भाजपचे ११ नगरसेवक नगरपालिकेत असल्याने उमेदवारी मागण्याची हीच योग्य वेळ असल्याचे किसनराव तारमळे यांनी सांगितले. यंदा राजेश वानखेडे, मंजू धल, प्रदीप वाघमारे, दिलीप जगताप, सुमेध भवार, सुबोध भारत आणि शशिकांत कांबळे यांनी उमेदवारी मिळावी, अशी मागणी केली. नुकत्याच या सातही उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या आहेत, असेही सांगण्यात आले. त्यामुळे आता शिवसेना-भाजपा युती होणार का? आणि झाल्यास युतीच्या जागावाटपात अंबरनाथची जागा भाजपाला मिळणार की शिवसेनेकडे राहणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Intro:Body:अंबरनाथ : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीत रस्सीखेच
ठाणे :विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपाची युती होणार असल्याचे संकेत मिळत असले तरी, अंबरनाथ विधानसभेच्या जागावाटपावरून युतीत रस्सीखेच होण्याचीही चिन्हे दिसत आहेत. सध्या शिवसेनेकडे असलेल्या अंबरनाथ विधानसभा मतदारसंघावर भाजपाने दावा करण्यास सुरुवात केली असून, जागांच्या अदलाबदलीच्या पॅटर्नमध्ये शिवसेनेने ही जागा भाजपाला द्यावी, अशी मागणी भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली आहे. तर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी भाजपाच्या मागणीला धुडकावून लावल्याचे पाहवयास मिळाले आहे.
अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे बालाजी किणीकर हे विद्यमान आमदार आहेत. सन २००९ मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेनंतर अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. तसेच बदलापूर व लगतचा काही भाग वगळून उल्हासनगरचा काही भाग या मतदारसंघात जोडण्यात आला. या निवडणुकीत शिवसेनेने डॉ. बालाजी किणीकर यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत स्थानिक उमेदवार हा मुद्दा प्रभावी ठरल्याने बालाजी किणीकर यांना सहजपणे विजय मिळवणे शक्य झाले. त्यानंतर झालेल्या २०१४ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाची युती न झाल्याने भाजपानेही उल्हासनगर महानगरपालिकेतील नगरसेवक राजेश वानखेडे यांना मैदानात उतरवले. या निवडणुकीत बालाजी किणीकर विजयी झाले आणि वानखेडे यांचा अवघ्या २०४१ मतांनी पराभव झाला. त्यामुळे स्वाभाविकच यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या आशा पल्लवित झाल्या असून, अंबरनाथ विधानसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यातूनच आता भाजपा शिवसेनेच्या अंबरनाथ मतदारसंघावर दावा करू लागली आहे. .
अलीकडेच अंबरनाथमध्ये शहराध्यक्ष भरत फुलोरे यांनी आयोजित केलेल्या भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत अंबरनाथ विधानसभेची जागा भाजपाला मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. भरत फुलोरे यांच्यासह ठाणे विभागीय उपाध्यक्ष किसन तारमळे, कृष्णा रसाळ-पाटील, पूर्णिमा कबरे, तुळशीराम चौधरी, सलीम चौधरी, संतोष शिंदे या कोअर कमिटी सदस्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील या निर्णयाची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली..
अंबरनाथ मतदारसंघ १९९० पासून भाजपाचा बालेकिल्ला होता. त्याकाळी रामभाऊ कापसे, जगन्नाथ पाटील आदींनी अंबरनाथ मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. यानंतर शिवसेना भाजपातील अंतर्गत तडजोडीमुळे अंबरनाथ शिवसेनेला देण्यात आले होते. तेव्हापासून अंबरनाथ मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आणि खासदार प्रतिनिधित्व करत आहेत. मागील निवडणुकीत शिवसेना-भाजपा युती न झाल्याने भाजपाचे उमेदवार राजेश वानखेडे यांचा निसटता पराभव झाला. यंदा भाजपाकडून सात उमेदवार इच्छुक असल्याचे पूर्णिमा कबरे यांनी सांगितले. येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यात काही ठिकाणी उमेदवारांची अदलाबदल होणार आहे. या बदलामध्ये अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचा समावेश करून भाजपाला अंबरनाथची जागा सोडावी, अशी मागणी कोअर कमिटीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आल्याचे या वेळी सांगण्यात आले. .
भाजपची ताकद वाढली
अंबरनाथ तालुक्यासह नगरपालिकेमध्ये भाजपाची ताकद वाढली असून, भाजपाचे ११ नगरसेवक नगरपालिकेत असल्याने उमेदवारी मागण्याची हीच योग्य वेळ असल्याचे किसनराव तारमळे यांनी सांगितले. यंदा राजेश वानखेडे, मंजू धल, प्रदीप वाघमारे, दिलीप जगताप, सुमेध भवार, सुबोध भारत आणि शशिकांत कांबळे यांनी उमेदवारी मिळावी, अशी मागणी केली. नुकत्याच या सातही उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या आहेत, असेही सांगण्यात आले. त्यामुळे आता शिवसेना-भाजपा युती होणार का? आणि झाल्यास युतीच्या जागावाटपात अंबरनाथची जागा भाजपाला मिळणार की शिवसेनेकडे राहणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे..

बाईट : पूर्णिमा कबरे, भाजप कोअर कमिटी सदस्य

बाईट : अरविंद वाळेकर, शिवसेना शहरप्रमुख

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.