ठाणे - आगामी निवडणुकीत बसपाच्या सहकार्याशिवाय ठाण्यात महापौर बसणार नाही, अशा ताकदीची संघटना उभारण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अॅड. संदीप ताजने यांनी ठाण्यात केले आहे. आगामी काळात येऊन घातलेल्या स्थानिक स्वराज्य सवस्थेच्या निवडणुकीत अनेक पक्ष आपली ताकत अजमावणार आहे. त्यासाठी अनेक पक्ष संघटना बांधण्यासाठी कामाला लागले आहेत. त्यातच आता बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांची पार्टीही जोमाने निवडणूक लढवणार आहे, यासाठी बहुजन समाज पार्टीने ठाण्यात संवाद यात्रेचा कार्यक्रम राबवला आहे.
हे ही वाचा - किरीट सोमैय्या सोमवारी महाविकास आघाडी सरकारमधील अजून एका मंत्र्यांचा घोटाळा आणणार समोर !
सत्तेसाठी बसपाची गरज लागण्याचा इतिहास -
ठाणे महानगर पालिकेच्या 2021 च्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेचा महापौर करण्यासाठी बसपाच्या दोन नगरसेवकांची गरज लागली होती. तेव्हा कोणाला पाठिंबा द्यायचा, यासाठी अगदी पक्षाच्या अध्यक्षा आणि प्रदेश कमिटी यांच्यात दोन मते निर्माण झाली होती. पुढे शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेऊन बसपा ठाणे पालिकेच्या सत्तेत बसली होती आता हीच वेळ पुन्हा येण्यासाठी पक्षाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.