ठाणे - कल्पित पिंपळे हल्ला प्रकरण ताजे असतानाच अवैध फेरीवाल्यांवर कारवाईला गेलेल्या पालिका कर्मचाऱ्यावर हल्ला करून जीवे मारण्याची धमकी देण्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना 18 ऑक्टोंबर रोजी घडली. 'कल्पिता पिंपळेची फक्त बोट छाटली आहेत. तुझी तर मानच छाटेल', आशा भाषेत धमकी ठाणे पालिका अतिक्रमण विभागाचे कर्मचारी काशिनाथ राठोड यांना दिली. फेरीवाला हा नारळ विक्रेता आहे.
तीन दिवसांपूर्वी फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास गेलेल्या अधिकाऱ्यांच्या पाटलीपाडा येथे नारळ विकणारा फेरीवाला अंगावर धावून जाऊन या प्रकारची धमकी देतो. ठाणे पालिका आयुक्तांच्या बंगल्याच्या बाहेरच्या परिसरात हे सर्व घडत आहे. धसका घेतल्याने राठोड यांचा रक्तदाब वाढला असून ते सुट्टीवर गेले आहेत. याला सर्वस्व जबाबदार ठाणे पालिका आहे. यासाठी फेरीवाला धोरण राबवणे गरजेचे आहे, असे भाजपा नेते मनोहर डुंबरे यांनी म्हटलं.
तीन दिवस झाले तरी गुन्हा नाही. पालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकारानंतर महापालिकेच्या प्रशासनाला जाग आली होती. मुख्यमंत्र्यांनी देखील या हल्ल्याची दखल घेत कल्पिता पिंपळे यांना फोन केला होता. मात्र, आता तर महापालिका आयुक्तांच्या घराबाहेर झालेल्या या प्रकारामुळे पालिका कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा गुन्हा पालिकेने दाखल नोंदवला नाही. यातून प्रशासनाचा आपल्या कर्मचार्यांच्या बाबतचा हलगर्जीपणा उघड होतोय, असेही ते म्हणाले. .
राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांचे हिरानंदानी इस्टेटमध्ये फ्लॅट आहेत. त्यामध्ये प्रताप सरनाईक पण बसून अनेक बिल्डर अनेक मोठे व्यावसायिक महसूल अधिकारी पोलीस अधिकारी होऊन पालिका अधिकारी यांचा समावेश आहे. असे असताना हिरानंदानी इस्टेटमध्ये जाणाऱ्या रस्त्यावर फेरीवाल्यांनी आपलं बस्तान बसवले आहे. पालिका आयुक्तांच्या घराबाहेरच असलेला हा परिसर जर फेरीवाला मुक्त होऊ शकत नाही. तर ठाणे शहर कसा फेरीवाला मुक्त होईल, असा सवाल आता नागरिक विचारत आहेत. माध्यमांनी ही बाब प्रशासनाकडे याबाबत जाब विचारला असता, महापालिकेचे अधिकारी या भागातील फेरीवाल्यांवर कारवाई करताना दिसत आहेत.
हेही वाचा - 100 कोटी डोज हा केवळ आकडा नसून देशाच्या सामर्थ्याचे प्रतिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी