ठाणे - 8 मार्च रोजी झालेल्या जागतिक महिला दिनानिमित्त मुब्रामध्ये हिजाबच्या समर्थनार्थ भव्य रॅली काढण्यात आली ( Thane Hijab Support Women Rallies ) होती. मरजिया शानू पठान या विद्यार्थ्यांनीच्या माध्यमातून सर्व मुस्लिम बहुबल महिला एकत्र येऊन शांततेच्या मार्गाने त्यांनी रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये शिक्षक, डॉक्टर, सीए, विद्यार्थीनी आणि उच्च पदावर काम करणाऱ्या शेकडो महिला सामील झाल्या होत्या. जसा महिला दिवस साजरा करतो तसा हिजाब दिवस देखील या पुढे 8 मार्च रोजी साजरा करणार असल्याचे मरजिया शानु पठाण यांनी सांगितले.
'हिजाब हा मुस्लीम धर्माचा पेहराव'
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकार व श्रीराम सेनेने शाळा आणि महाविद्यालयामध्ये हिजाबवर बंदी आणत राजकीय व धार्मिक रंग दिला होता ते कुठेतरी थांबले पाहिजे असे देखील रैली मधील महिलांनी सांगितले. हिजाब हा आमचा अलंकार आहे. माझा हिजाब माझा अभिमान आशा घोषणा देखील देण्यात आल्या. हिजाब हा मुस्लीम धर्माचा पेहराव आहे. इस्लाम धर्मातील पूर्वापार परंपरांना धक्का लावण्याचा प्रयत्न काही जण करत आहे. ते कुठे तरी थांबले पाहिजे असे देखील यावेळी महिलांनी सांगितले.
महिला दिन हिजाब दिन करावा -
महिला दिनादिवशी प्रत्येक वर्षी हिजाब दिन आम्ही साजरा करणार आहोत असा निर्धार मुंब्रा भागतील तरुणीनी केला आहे. महिला दिनाचे अवचित्त साधून मुंब्रामध्ये हिजाब समर्थन रैलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शेकडो महिला व तरुण मुलीनी भाग घेतला होता. खासकरुण उच्चशिक्षित तरुणी मोठ्या प्रमाणात यात सहभागी झाल्या होत्या. हिजाब आमच्या संस्कृतिचा भाग आहे. आमची संस्कृती जपत आम्ही उच्चशिक्षण घेत आहोत, येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणत महिला शिक्षणाच्या आधरावर मोठ्या जागी कार्यरत होणार आहेत, आणि हे काय आंदोलन नाही तर एक मसेज आहे, अशा प्रतिक्रिया ठाण्यातील मुस्लिम तरुणीनी दिल्यात.
हेही वाचा - Goa Election 2022 : सुदिन ढवळीकरांचा मुख्यमंत्री पदावर दावा; चिदंबरम यांच्याशी केली चर्चा