ETV Bharat / city

Bail to Ketaki Chitale : अभिनेत्री केतकी चितळेला जामीन मंजूर; तरीही 21 जूनपर्यंत मुक्काम तुरुंगातच - Thane Court Bail to Ketaki Chitale

अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे न्यायलयाने जामीन मंजूर (Thane Court Bail to Ketaki Chitale) केला आहे. तिला अॅट्रोसिटी अंतर्गत नवी मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर आज ठाणे न्यायालयाने अखेर तिला जामीन मंजूर केला. २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर तिला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Ketki Chitale
Ketki Chitale
author img

By

Published : Jun 16, 2022, 4:07 PM IST

Updated : Jun 16, 2022, 6:26 PM IST

ठाणे - अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे न्यायलयाने जामीन मंजूर (Thane Court Bail to Ketaki Chitale) केला आहे. तिला अॅट्रोसिटी अंतर्गत नवी मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर आज ठाणे न्यायालयाने अखेर तिला जामीन मंजूर केला. २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर तिला जामीन मंजूर करण्यात आला आहे. नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात २०२०‌ साली अॅट्रोसेटी कायद्याअंतर्गत तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, जामीन मिळाल्यानंतरही केतकीचा मुक्काम 21 जूनपर्यंत तुरुंगातच असणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या पोस्ट प्रकरणी 21 जूनला न्यायालयात सुनावणी होणार आहे.

  • Thane court grants bail to Marathi actor Ketaki Chitale in a case registered against her under Atrocities Act. She has been granted bail on a surety amount of Rs 25,000. However, she'll remain in jail as she is accused in another case in which the bail hearing is on June 21.

    — ANI (@ANI) June 16, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काय आहे प्रकरण - नवी मुंबई पोलिसांनी केतकी चितळेला अटक केली होती. तिला ठाणे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. ठाणे न्यायालयात याप्रकरणी आज सुनावणी झाली. त्यानंतर केतकीला २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.

DGP यांना नोटीस - अभिनेत्री केतकी चितळे प्रकरणात पोलीस महासंचालकांना राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीस पाठवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

पोलीस महासंचालकांना सात दिवसाच्या आत लेखी अहवाल सादर करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. 17 जून रोजी होणाऱ्या सुनावणी दरम्यान प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेशही महिला आयोगाने दिले आहेत.

हेही वाचा - Actress Ketki Chitale : केतकी चितळेची मुंबई उच्च न्यायालयात धाव; अटक बेकायदेशीर असल्याची याचिका दाखल

Last Updated : Jun 16, 2022, 6:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.