ETV Bharat / city

Non-bailable Warrant Cancelled : परमबीर सिंग यांच्याविरोधातले अजामीनपात्र वॉरंट ठाणे न्यायालयाने केले रद्द - ठाणे कोर्ट वॉरंट रद्द

परमबीर सिंग (Param Bir Singh) यांच्याविरुद्धचे अजामीनपात्र वॉरंट ठाणे न्यायालयाने आज रद्द (Thane Court Non-bailable Warrant Cancelled) केले आहे. परमबीर सिंग हे चोौकसीसाठी हजर झाल्याने त्यांच्याविरोधातले अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यात आले आहे.

param bir singh
परमबीर सिंग
author img

By

Published : Nov 26, 2021, 4:26 PM IST

Updated : Nov 26, 2021, 5:19 PM IST

ठाणे - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांच्याविरुद्धचे अजामीनपात्र वॉरंट ठाणे न्यायालयाने आज रद्द (Thane Court Non-bailable Warrant Cancelled) केले आहे. ठाणे पोलिसांना तपासात सहकार्य करण्याचे निर्देश परमबीर सिंग यांना न्यायालयाने दिले आहेत.

  • या प्रकरणात मिळाला दिलासा -

परमबीर सिंग यांनी आज ठाणेनगर पोलीस स्टेशनला हजेरी लावली होती. सोनू जालानने मोक्का न लावण्यासाठी खंडणी मागितल्याचा आरोप परमबीर सिंग यांच्यावर केला होता. तसेच तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी ठाणे न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते. त्यानंतर सिंग हे न्यायालयात हजर झाले आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. न्यायालयाने या प्रकरणी 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अजामीनपात्र वॉरंट रद्द केले आहे. त्यामुळे सिंग यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

  • गोरेगावातील खंडणी प्रकरणातही अजामीनपात्र वॉरंट जारी आहे-

परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यासाठी आणि त्यांच्याविरुद्ध असलेला गुन्हेगारीचा आदेश रद्द करण्यासाठी मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली आहे. गेल्या आठवड्यात त्यांना फरार घोषित करण्यात आले होते.

बिल्डरसह बिमल अग्रवाल यांच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलीस ठाण्यात परमबीर सिंग यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. तसेच न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले होते. आता हे वॉरंट रद्द करण्यात यावे या मागणीसाठी परमबीर सिंग यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

Last Updated : Nov 26, 2021, 5:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.