ETV Bharat / city

मिरा भाईंदर पालिका मुख्यालयात टेंडर वॉर; दोन ठेकेदारांची हाणामारी

author img

By

Published : Mar 26, 2021, 6:29 PM IST

मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्यालयातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर दोन कंत्राटदारांची हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.

Tender war at Mira Bhayander Palika headquarters
मिरा भाईंदर पालिका मुख्यालयात टेंडर वॉर

मीरा भाईंदर (ठाणे) - मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्यालयातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर दोन कंत्राटदारांची हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. यात दोघांना गंभीर दुखापत झाल्यामुळे दोघांविरुद्ध भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिरा भाईंदर पालिका मुख्यालयात टेंडर वॉर
चक्क मुख्यालयात हाणामारी-
मीरा भाईंदर महानगरपालिका मुख्यालय भाईंदर पश्चिम येथे आहे. मुख्यालयाच्या चौथ्या मजल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यालय आहे. त्याठिकाणी कंत्राटदारांची वर्दळ सुरू असते. मात्र मंगळवारी दुपारी राजेश सिंग आणि कुणाल जोशी या दोघांमध्ये हाणामारी झाली. हाणामारीमुळे पालिका मुख्यालयात एकच खळबळ उडाली होती. शहरातील प्रमुख प्रशासकीय इमारतीमध्ये हाणामारी घटनेमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण संपूर्ण महानगरपालिका इमारतीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असताना त्याच दिवशी चौथ्या मजल्यावरचे सीसीटीव्ही बंद असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामुळे एकप्रकारे प्रशासन ठेकेदारांना पाठीशी घालत असल्याचं दिसून येत आहे.

ठेक्यासाठी कंत्राटदारमध्ये हाणामारी-

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका विशिष्ट नगरसेवकांच्या प्रभागात विकास काम करण्याकरिता या दोघांनी निविदा भरल्याने वाद झाला असल्याचे उघडकीस आले आहे. यात दोघांना गंभीर दुखापत होऊन रक्त वाहू लागल्याने खळबळ उघडली. त्यामुळे या घटनेची तक्रार भाईंदर पश्विम येथील पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. भाईंदर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्ह्यांची नोंद करण्यात आली, अशी माहिती भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुगुतराव पाटील यांनी दिली.

हेही वाचा- सरकारने खुशाल चौकशी करावी, आम्ही पुरावे न्यायालयात सादर करू - फडणवीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.