ETV Bharat / city

TC Beaten By Passenger : धावत्या एक्सप्रेसमध्ये प्रवाशाने टीसीला चोपले

मुंबईहुन नागपूरकडे जाणाऱ्या विदर्भ एक्सप्रेसमध्ये ( Vidarbha Express ) एका प्रवाशाने टिसीला मारहाण ( TC beaten up by passenger ) केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टीसीने रेल्वे प्रवासाचे तिकीट विच्यारल्यावर दोघात जोरदार भांडण झाले. प्रवाशाकडे तिकीट नसल्याने टीसीला शिवागीळ करत मारहाण ( TC beaten up by passenger ) केली आहे.

TC beaten up by passenger
टीसीला प्रवाशाकडून मारहाण
author img

By

Published : Jul 23, 2022, 7:45 PM IST

Updated : Jul 23, 2022, 9:45 PM IST

ठाणे : मुंबईहुन नागपूरकडे जाणाऱ्या विदर्भ एक्सप्रेसमधील ( Vidarbha Express ) एका प्रवाशाने टीसीला चांगलेच झोडपले आहे. टीसीने रेल्वे प्रवासाचे तिकीट विच्यारल्यावर दोघात जोरदार भांडण झाले. प्रवाशाकडे तिकीट नसल्याने टीसीला शिवागीळ करत मारहाण ( TC beaten up by passenger ) केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. विजयन शिवा पेरुमल (३४, रा. कल्याण) असे गुन्हा दाखल झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. तर, राजेशकुमार सरयुकुमार गुप्ता (४२) असे मारहाण झालेल्या टीसीचे नाव आहे.

तिकीट तपासतांना दोघात वाद - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेशकुमार गुप्ता ( Rajesh Kumar Gupta ) हे विदर्भ एक्सप्रेसमध्ये टीसी म्हणून कर्तव्यावर होते. मुंबईकडून एक्सप्रेस कल्याणकडे येत असताना प्रत्येक डब्यातील प्रवाशाचे तिकीट ते तपासत होते. डोंबिवली रेल्वे स्थानकातून एक्सप्रेस कल्याणच्या दिशेने धावत असताना आरोपी विजयन शिवा पेरुमल ( Vijayan Shiva Perumal ) या प्रवाशाला राजेशकुमार यांनी तिकीट विचारले. मात्र, आरोपी विजयन याने तिकीट होते. मात्र, ते हरवले असल्याचे सांगितल्याने त्यांनी प्रवाशाला दंड भरण्यास सांगितले. त्याच गोष्टीचा राग आल्याने विजयन याने टीसी राजेशकुमार यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी इतर प्रवासी मध्यस्थ केल्याने मारहाणीचा प्रकार रोखला. मात्र ट्रेन कल्याण रेल्वे स्थानकात थांबून काही वेळातच पुढील प्रवासासाठी निघाली होती.

हेही वाचा - Partha Chatterjee Arrested : पश्चिम बंगाल शिक्षक भरती घोटाळा : मंत्री पार्थ चॅटर्जी यांना अटक

लोहमार्ग पोलिसांकडून तपास सुूरू - कल्याण रेल्वे स्थानकात जाताच टीसी राजेशकुमार यांनी मारहाण करणाऱ्या विजयनची माहिती काढली. त्यानंतर मनमाड लोहमार्ग पोलीस ठाण्यात विजयन विरुध्द तक्रार दाखल केली. मात्र, मारहाणीचा प्रकार डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने दाखल केलेला गुन्हा डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात वर्ग केला असून लोहमार्ग पोलिसांनी तपास सुूरू केला आहे.

हेही वाचा - Nashik Crime News : नाशिकच्या युवकाचे लडाखमध्ये अपघाती निधन; सहलीला मित्रांसह बुलेटवरून युवकाचा प्रवास

Last Updated : Jul 23, 2022, 9:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.