ETV Bharat / city

Parambir Singh case परमबीर सिंग प्रकरणात पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा संशय; ६० दिवसांनंतरही चार्जशीट नाही

विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी मात्र परमबीर सिंग (Parambir Singh case) यांच्याबाबत पोलीस हलगर्जीपणा करीत असल्याचा संशय व्यक्त केला आहे. गुन्हा दाखल होऊन ६० दिवस झाल्यानंतरही पोलिसांनी अद्याप चार्जशीट दाखल केली नाही. त्यामुळे, आरोपीला जामीन मिळण्यास मदत होत असल्याचा संशय विशेष सरकारी वकील घरत यांनी व्यक्त केला.

Parambir Singh case Pradeep Gharat
परमबीर सिंग प्रकरण हलगर्जीपणा
author img

By

Published : Nov 23, 2021, 8:26 PM IST

ठाणे - ठाण्याच्या पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेले ठाणे आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh case) यांचा सहकारी असलेला आरोपी मर्चंट याच्या जमीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. दरम्यान विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी मात्र परमबीर सिंग यांच्याबाबत पोलीस हलगर्जीपणा करीत असल्याचा संशय व्यक्त केला आहे. गुन्हा दाखल होऊन ६० दिवस झाल्यानंतरही पोलिसांनी अद्याप चार्जशीट दाखल केली नाही. त्यामुळे, आरोपीला जामीन मिळण्यास मदत होत असल्याचा संशय विशेष सरकारी वकील घरत यांनी व्यक्त केला.

माहिती देताना विशेष सरकारी वकील प्रदीप घरत

हेही वाचा - हत्येचा धक्कादायक उलगडा; दाराच्या फटीतून सबंध बघतो म्हणून केली रिक्षाचालकाची हत्या

ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्यात ठाणे आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह आठ पोलीस अधिकारी आणि अन्य आरोपींचा समावेश आहे. परमबीर सिंग हे परागंदा आहेत. तर, या गुन्ह्यातील आरोपी तारिक परवीन मर्चंट याचे न्यायालयात दोन जामीन अर्ज आहेत. त्यातील एक पेंडीग आहे, तर दुसरा अर्ज हा पोलिसांनी चार्जशीट दाखल केली नसल्याने १६२ प्रमाणे आहे. त्यावर आता बुधवारी सुनावणी होणार आहे. पोलिसांनी चार्जशीट सादर न केल्याने न्यायालयात युक्तिवाद काय करणार? हा प्रश्न असल्याचे घरात यांनी सांगितले. त्यामुळे, आरोपीला जामीन मंजूर होण्याची शक्यता निर्माण होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा बाऊ

सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांना दिलेल्या दिलाशाबाबत बाऊ करण्यात येत आहे. न्यायलयाने परमबीर सिंग यांना ६ डिसेंबर पर्यंत अटक करू नये, असा दिलासा दिला आहे. पण, पोलीस त्यांना अटक करू शकतात. कारण त्यांच्या अर्जावर सुनावणी झालेली नाही. तेवढा अधिकार पोलिसांना आहे. आता न्यायालयाने आदेश दिल्याप्रमाणे ६ डिसेंबर पर्यंत परमबीर सिंग यांना न्यायालयात हजर राहणे क्रमप्राप्त आहे.

न्यायालयाने गंभीर नोंद घेतली

परमबीर सिंग यांच्याबाबत न्यायालयाने गंभीर दखल घेतलेली आहे. एका उच्च दर्जाचा अधिकारीच पोलिसांवर अविश्वास दाखवीत असल्याने याची न्यायालयाने गंभीर दखल घेल्याचे सुतोवाचही विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केले.

मंगळवारी दुपारी कळविले....सुनावणी बुधवारवर गेली

ठाणे न्यायालयात दोन जामीन अर्ज करणारा आरोपी तारिक परवीन मर्चंट याच्या अर्जावर आज सुनावणी होणार होती, मात्र नियुक्त सरकारी वकील प्रदीप घरत यांना मंगळवारी दुपारी सुनावणीसाठी येऊ शकता काय? असे कळविल्याने आणि उशीर झाल्याने सुनावणी न्यायालयाने बुधवारी घेण्याचे सांगितले. त्यामुळे, मर्चंट याच्या अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. सरकारी वकील म्हणून शासनाने नियुक्ती केल्यानंतरही आजपावतो तपास अधिकारी यांनी गुन्ह्याच्या तपशिलाचा दस्तावेज देणे आवश्यक आहे. मात्र, त्यात दिरंगाई केल्याने सुनावणी बुधवारी होणार आहे. या हलगर्जीपणामुळे याची तक्रार राज्यशासनाकडे करण्यात आलेली आहे.

हेही वाचा - मुंब्रा पोलिसांची धडक कारवाई.. 16 लाखांच्या एमडी ड्रग्ज पावडरसह दोन जण गजाआड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.