ETV Bharat / city

Thane Crime: मद्यपी दिराला वैतागल्याने भावजयने केला एकच वारात दिराचा खून - sister in law killed her husband brother

दारूच्या व्यसनाने लिप्त झालेल्या दिराने आपल्या भावजयशी भांडणे केले आणि रागाच्या भरात भावजयीला मारहाण केली. यामुळे संतापलेल्या भावजयीने भाजी कापण्याच्या चाकूने (husband brother killing with knife) गळ्यावर वार करून दिराची हत्या (sister in law killed her husband brother) केल्याची घटना शुक्रवारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली.

Thane Crime
Thane Crime
author img

By

Published : Oct 1, 2022, 8:53 PM IST

ठाणे : दारूच्या व्यसनाने लिप्त झालेल्या दिराने आपल्या भावजयशी भांडणे केले आणि रागाच्या भरात भावजयीला मारहाण केली. यामुळे संतापलेल्या भावजयीने भाजी कापण्याच्या चाकूने (husband brother killing with knife) गळ्यावर वार करून दिराची हत्या (sister in law killed her husband brother) केल्याची घटना शुक्रवारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी कळवा पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून आरोपी भावजय आरोपी महिला प्रियंका आकाश सुरवाडे, (वय 23 वर्षे) हिला तात्काळ अटक केली. (Thane Crime)

भांडण आणि मारहाणीतून संताप अनावर अन् झाला खून - याबाबतची हकीकत अशी की, मृतक सागर दिलीप सुरवाडे (वय 25 वर्षे, रा. सुमित्रादेवी चाळ, कळवा पूर्व) हे त्यांची पत्नी व भाउजय प्रियंका आकाश सुरवाडे (वय 23 वर्षे) हिचेसह एकत्र राहत होते. सागर सुरवाडे याला दारूचे व्यसन होते. तो काही एक कामधंदा करीत नसल्याने त्याचे व भाउजय प्रियंका सुरवाडे यांच्यात नेहमी भांडणे व्हायची.

शुक्रवारी 3 वाजण्याच्या सुमारास मृतक सागर सुरवाडे हा दारूच्या नशेत असताना भाउजय प्रियंका आकाश सुरवाडे हिचेसोबत भांडण करून तिला मारहाण केली. त्यावेळी प्रियंका आकाश सुरवाडे हिने रागाच्या भरात भाजी कापण्याच्या चाकुने सागर सुरवाडे याच्या गळ्यावर वार करून त्याला गंभीर जखमी केले. यात सागरचा मृत्यू झाला. सागरच्या खून प्रकरणी भाउजय प्रियंका आकाश सुरवाडे हिला अटक करून गुन्हा दाखल केला. कळवा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.