ETV Bharat / city

Plastic Ban In Thane : ठाण्यात १ जुलै पासून प्लॅस्टिक पिशवीवर बंदी

प्लॅस्टिकचा वापर वाढला आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाण्यात कोणतीच प्लॅस्टिक कॅरीबॅग वापरता येणार ( Single Use Plastic Ban In Thane ) नाही.

Plastic
Plastic
author img

By

Published : Jun 4, 2022, 7:49 PM IST

ठाणे - १ जुलैपासून ठाण्यात 'नो प्लॅस्टिक' असा फर्मानच महापालिकेने ( Thane Municipal Corporation ) काढला आहे. प्लॅस्टिकचा वापर वाढला आहे. त्यामुळे त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून प्लॅस्टिक बंदीबाबत अधिसूचना जारी करण्यात आहे. सर्व शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या अधिसूचनेनुसार 1 जुलैपासून राज्यात कोणतीच प्लॅस्टिक कॅरीबॅग वापरता येणार ( Single Use Plastic Ban In Thane ) नाही. तसेच, सार्वजनिक ठिकाणी वापरण्यात येणारे ग्लास, चमचे, वेगवेगळ्या प्लॅस्टिक वस्तूंचा वापर करता येणार नाही. 1 जुलै पासून या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा ( TMC chief Dr.Vipin Sharma ) यांनी दिले आहेत.

राज्य शासनाच्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेत सिटी टास्क फोर्सची बैठक झाली. महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी, तसेच विविध विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. प्लॅस्टिकचा वापर हा सर्वांना भेडसावणारा प्रश्न ठरत आहे. प्लॅस्टिकची योग्य प्रकारे विल्हेवाट होत नसल्यामुळे त्याच्या वापरावर बंदी घालण्याचा महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. त्याची 1 जूलै 2022 पासून काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. प्लॅस्टिक वापरासंदर्भात जनजागृती करण्यासाठी महापालिका स्तरावर विविध उपाययोजना करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी टास्क फोर्सच्या बैठकीत महापालिका अधिकाऱ्यांना दिले.

शासनाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार यापुढे कोणत्याही प्रकारची कॅरीबॅग वापरता येणार नाही. महापालिकेने नियोजनबद्ध कार्यक्रम आखून दुकानदार व सर्वसामान्य नागरिकांमध्ये याबाबतची माहिती प्रसिद्ध करावी. प्लॅस्टिकचे निर्मुलन करण्यासाठी यंत्रणांनी पुढाकार घ्यावा. बाजारपेठा तसेच मांस, मटण, मासळी व इतर व्यावसायिक यांचेकडून प्लॅस्टिकचा वापर झाल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी व ही मोहिम दर आठवड्याला प्रभावीपणे राबवावी. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना प्लॅस्टिक बंदीबाबत शपथ देऊन रॅलीचे आयोजन करावे. मॉल्समध्ये जनजागृती करावी, असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

अतिरिक्त महापालिका आयुक्त संदीप माळवी प्रतिक्रिया देताना

नागरिकांनी स्वतः पुढाकार घ्यावा - नागरिकांनी देखील महानगरपालिका क्षेत्रात प्रतिबंधीत प्लॅस्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्लॅस्टिक कचरा इतरत्र न टाकता सुका कचरा व्यवस्थापन केंद्राकडे जमा करावा, कापडी व कागदी पिशव्यांचा वापर जास्तीत जास्त करावा. साहित्य, वस्तू खरेदी करताना दुकानदारांना प्लॅस्टिक पिशव्यांचा आग्रह धरु नये व आपण स्वत: घरातून निघताना कापडी पिशव्या सोबत घेवून महापालिकेच्या उपक्रमास सहकार्य, असे आवाहन देखील महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.

व्यापाऱ्यांचे मत वेगळे - प्लॅस्टिक बंदी जाहीर करताना पर्यायी मार्ग देखील सांगावे. जेणेकरून आवश्यक त्या ठिकाणी गरजेला अडचण निर्माण होऊ, नये यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे, अशी विनंती व्यापारी संघटनेने केली आहे. प्लॅस्टिकचा वापर काही ठिकाणी अनिवार्य असतो. अशा बाबी या कारवाईत वगळाव्यात, असे आवाहन ही त्यांनी केले आहे.

हेही वाचा - Nawab Malik Office : मंत्री महोदय कोठडीत, कर्मचारी मात्र एसीत...कार्यालय बंद असतानाही लाखोंचा खर्च

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.