ETV Bharat / city

पाच मजली इमारतीच्या मीटर बॉक्समध्ये आग; रहिवाशांनी पहिल्या मजल्यावरून घेतल्या खाली उड्या

इमारतीच्या वीज मीटर बॉक्समध्ये शॉर्टसर्किटमुळे तळमजल्यावरील मोकळ्या जागेत भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मात्र, या घटनेमुळे रहिवाशांमध्ये घबराटीचे वातारण पसरून काही रहिवाशांनी जीवाच्या भीतीने पहिल्या मजल्यावरून खाली उड्या घेतल्या.

shortcircuit
इमारतीच्या वीज मीटर बॉक्समध्ये शॉर्टसर्किट
author img

By

Published : Nov 30, 2019, 12:18 PM IST

Updated : Nov 30, 2019, 12:36 PM IST

ठाणे - इमारतीच्या वीज मीटर बॉक्समध्ये शॉर्टसर्किटमुळे तळमजल्यावरील मोकळ्या जागेमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मात्र, या घटनेमुळे रहिवाशांमध्ये घबराटीचे वातारण पसरून काही रहिवाशांनी जीवाच्या भीतीने पहिल्या मजल्यावरून खाली उड्या घेतल्या. यामध्ये एक रहिवासी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना उंबर्डे गावातील रौनक सिटीच्या बाजूला असलेल्या ओम रेसिडेन्सी या ५ मजली इमारतीमध्ये घडली आहे.

पाच मजली इमारतीच्या मीटर बॉक्समध्ये आग; घाबरून रहिवाशांच्या पहिल्या मजल्यावरून खाली उड्या

हेही वाचा - ठाण्यात बाराव्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू

कल्याण पश्चिमेकडील उंबर्डे परिसरात ओम रेसिडेन्सी नावाची ५ मजली इमारत आहे. आज (शनिवार) सकाळी साडेआठच्या सुमारास कल्याणच्या अग्निमशन दलाच्या कार्यालयात रहिवाशांनी संपर्क करून मीटर बॉक्समध्ये आग लागल्याची माहिती दिली. तोपर्यंत या आगीच्या झळा इमारतीच्या पहिल्या मजल्यापर्यंत पोहोचल्या होत्या. तसेच तळमजल्यावरील मोकळी जागा व पायऱ्यांवर धुराचे लोट पसरल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. यावेळी काही रहिवाशांनी जीवाच्या भीतीने पहिल्या मजल्यावरून खाली उड्या घेतल्या. त्यामध्ये मुकूंद भोईर (५०) हे गंभीर जखमी झाले असून ४ ते ५ रहिवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

दरम्यान, कल्याण अग्निशमन दल वेळेत घटनास्थळी दाखल होऊन मीटर बॉक्समधील आग दीड तासात आटोक्यात आणली. त्यामुळे तळमजल्यावरील घरांचा आगीपासून बचाव झाला. मात्र, मीटर बॉक्स संपूर्ण जळून खाक झाला. या आगीच्या घटनेमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याचे पाहायला मिळाले.

Intro:kit 319Body: पाच मजली इमारतीच्या मीटर बॉक्समध्ये आग ; आगीमुळे घाबरून रहिवाशांच्या पहिल्या मजल्यावरून उड्या, १ गंभीर

ठाणे : इमारतीच्या वीज मीटर बॉक्समध्ये शॉर्टसर्किटमुळे तळमजल्यावरील पेसेज मध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मात्र या घटनेमुळे रहिवाशांमध्ये घबराटीचे वातारण पसरून काही रहिवाशांनी जिवाच्या भीतीने पहिल्या मजल्यावरून उड्या घेतल्या. यामध्ये १ रहिवाशी गंभीर जखमी झाला आहे. हि घटना उंबर्डे गावातील रौनक सिटीच्या बाजूला असलेल्या ओम रेसिडेन्सी या ५ मजली इमारतीमध्ये घडली आहे.

कल्याण पश्चिमेकडील उंबर्डे परिसरात ओम रेसिडेन्सी नावाची ५ मजली इमारत आहे. आज सकाळच्या साडे आठच्या सुमारास कल्याणच्या अग्निमशन दलाच्या कार्यलयात रहिवाशांनी संपर्क करून मीटर बॉक्समध्ये आग लागल्याची माहिती दिली. तोपर्यत हि आग एवढी भडकली कि, इमारतीच्या पहिल्या मजल्यापर्यत या आगीच्या झळा पोहचल्या होत्या. तसेच तळमजल्यावरील पेसेज व जिन्यात धुराचे लोट पसरल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरून काही रहिवाशांनी जिवाच्या भीतीने पहिल्या मजल्यावरून उड्या घेतल्या. त्यामध्ये मुकूंद भोईर (५०) हे गंभीर जखमी झाले. तर ४ ते ५ रहिवाशी किरकोळ जखमी झाले आहे.

दरम्यान, कल्याण अग्निशमन दल वेळेत घटनस्थळी दाखल होऊन मीटर बॉक्स मधील आग दीड तासात आटोक्यात आणून तळमज्यावरील घरांचा आगीपासून बचाव केला. मात्र मीटर बॉक्स संपूर्ण जळून खाक झाला. या आगीच्या घटनेमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याचे पाहवयास मिळाले.

Conclusion:fayar
Last Updated : Nov 30, 2019, 12:36 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.