ETV Bharat / city

भर रस्त्यात महिलेला दांडक्याने मारहाण, व्हायरल व्हिडिओचे धक्कादायक कारण आले पुढे; आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल - woman beaten on road in Thane Video viral

भर रस्त्यात एका महिलेला एका कुटुंबातील टोळक्याने लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ (viral video of woman beaten with stick on road) गुरुवारी व्हायरल (Women beating video viral Thane) झाला होता. या व्हायरल व्हिडीओचे धक्कादायक कारण (shocking reason behind viral video of woman beaten) गुन्हा दाखल झाल्यानंतर समोर आले आहे. ही मारहाण प्रेम संबधातून केल्याची तक्रार (Beating due to love affair Kalyan Thane) पीडित महिलेने कल्याण तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली असून त्या तक्रारीनुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे. विक्रम अनंता भोईर, अनंता भोईर, वैभव भोईर, विद्या रवी भोईर, सुरेखा अनंता भोईर, अन्य एक महिला (सर्व रा. वरपगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. (Crime News Thane)

shocking reason behind viral video of woman beaten

author img

By

Published : Oct 10, 2022, 2:11 PM IST

ठाणे : भर रस्त्यात एका महिलेला एका कुटुंबातील टोळक्याने लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ (viral video of woman beaten with stick on road) गुरुवारी व्हायरल (Women beating video viral Thane) झाला होता. या व्हायरल व्हिडीओचे धक्कादायक कारण (shocking reason behind viral video of woman beaten) गुन्हा दाखल झाल्यानंतर समोर आले आहे. ही मारहाण प्रेम संबधातून केल्याची तक्रार (Beating due to love affair Kalyan Thane) पीडित महिलेने कल्याण तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली असून त्या तक्रारीनुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे. विक्रम अनंता भोईर, अनंता भोईर, वैभव भोईर, विद्या रवी भोईर, सुरेखा अनंता भोईर, अन्य एक महिला (सर्व रा. वरपगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. (Crime News Thane)

पीडितेला भर रस्त्यात महिलांकडून मारहाण, व्हिडिओ व्हायरल

लग्नाचा तगादा लावला आणि झाली मारहाण- कल्याण तालुक्यातील वरप गावात ३१ वर्षीय पीडित महिला पती आणि तीन मुलांसह राहत होती. मात्र पिडितेच्या पतीला वरप गावातील विक्रम या तरुणाशी पत्नीचे प्रेम संबंध असल्याची माहिती मिळाल्याने गेली चार वर्षांपासून तो पत्नीपासून विभक्त राहत आहे. तर पत्नी आणि तिची तीन मुले वरप गावात राहत आहेत. पीडित महिलेने प्रियकर विक्रमच्या मागे लग्नाचा तगादा लावून मुलींची जबाबदारी घेण्यास सांगितले; मात्र त्याने नकार देऊन याऊलट तिला बेदम मारहाण केली. त्यामुळे पीडितेने त्याच्या विरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.

पीडितेचे अपहरण आणि नंतर मारहाण- पीडित महिला आपल्या तीन मुलांना गुरुवारी सकाळच्या सुमारास शाळेत सोडण्यासाठी गेली होती. तेथून पायी परत घरी येत असताना तिला एक इनोव्हा कार आडवी झाली. त्या कारमध्ये प्रियकराचे कुटूंब आणि इतर आरोपी होते. त्यांनी पीडित महिलेला शिवीगाळ करत जबरदस्तीने आपल्या कारमध्ये बसविले आणि तिला टिटवाळा येथे नेले. तेथे तुझे लग्न विक्रम सोबत लावायचे असे ते बोलू लागले. कार टिटवाळयात पोहचताच तेथे प्रियकर विक्रम दुचाकी घेऊन उभा होता. पीडित महिलेने कारमधून उतरून विक्रमच्या दिशेने धाव घेतली. विक्रमने दुचाकीचा तिला जोराचा धक्का देऊन खाली पाडून तिला बेदम मारहाण सुरू केली. विक्रमचे वडील अनंता यांनीही महिलेला मारहाण केली.

मुले पळविणारी असल्याचे सांगत मारहाण- या दोघांच्या तावडीतून सुटून पीडित महिला टिटवाळा रेल्वे स्थानकाच्या दिशेने पळत सुटली. त्यावेळी सहा आरोपी तिचा पाठलाग करत ही महिला मुले पळविणारी आहे असे ओरडत तिच्या पाठीमागे पळू लागले. पादचाऱ्यांनी या महिलेला पकडले. पुन्हा आरोपींनी तिला काठ्यांनी बेदम मारहाण केली. मारहाण होत असताना चोर म्हणून आपणास कोणीही वाचविण्यास आले नाही. या घटनेनंतर विक्रम याने पीडित महिलेचा मोबाईल काढून घेतला. त्याच्यासह इतर आरोपी पळून गेले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.