ठाणे - अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईला पाकव्याप्त म्हटल्याने शिवसेनेच्या महिला आघडीने ठाण्यात कंगनाच्या पोस्टरला काळ फासत जोडा मारो आंदोलन केले आहे. कंगनाला मुंबईमध्ये पाय ठेवू देणार नाही, असा इशाराही यावेळेला शिवसेनेच्या महिला आघाडीने दिला आहे.
ठाण्यात आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळाजवळ महिला शिवसैनिकांनी आंदोलन केले. महिला शिवसैनिकांनी यावेळेला कंगनाच्या विरोधात घोषणाबाजीदेखील केली. ठाणे महानगरपालिकेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे म्हणाल्या, की कंगना रणौतने मुंबईला पाकव्याप्त म्हटल्याचे वक्तव्य हे निषेधार्ह आहे. मुंबईसाठी अनेक हुतात्मे झाले आहेत. मुंबई आमची शान आहे. ती जर असेच बालीश वक्तव्य करत असेल तर तिच्या सर्व चित्रपटांवर आम्ही बहिष्कार टाकणार आहोत. कंगना ९ सप्टेंबरला मुंबईत येत असेल तर तिचे शिवसेना स्टाईलने आम्ही स्वागत करू, असा इशारा शिवसेना नेत्या मिनाक्षी शिंदे यांनी दिला आहे.
हेही वाचा-कंगनाचं शिवसेनेला आव्हान; 'या तारखेला मुंबईत येतेय, हिम्मत असेल तर रोखून दाखवा'
मुंबईत सुरक्षित वाटत नसून पाक व्याप्त काश्मीर मध्ये आपण आलो की काय?, अशी टीका करणारे ट्वीट कंगनाने केले होते. या तिच्या वक्तव्यानंतर राज्यातल्या अनेक नेत्यांनी त्याबाबद्दल नाराजी व्यक्त करत टीका केली आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ही कंगना रनौत यांना मुंबईतील सुरक्षा पटत नसेल तर त्यांनी आपला गाशा गुंडाळावा, असे वक्तव्य केले होते.
हेही वाचा-कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही- गृहमंत्री अनिल देशमुख