ETV Bharat / city

पत्नीच्या छळाला कंटाळून शिवसेनेच्या नगरसेवकाचा 'फेसबुक लाईव्ह' करुन आत्महत्येचा प्रयत्न - भारतीय न्यायव्यवस्था

शिवसेनेच्या नगरसेवकाने फेसबुक लाइव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. पत्नीने केलेल्या पोलिसांकडील तक्रारीमुळे व्यथीत होऊन हे टोकोचे पाऊल उचलल्याचे त्यांनी या व्हिडिओत सांगितले आहे.

police
नगरसेवक गणेश कांबळे
author img

By

Published : May 19, 2020, 1:33 PM IST

Updated : May 19, 2020, 5:32 PM IST

ठाणे - आपल्या पत्नीने केलेल्या पोलिसांकडील तक्रारीमुळे व्यथीत झालेल्या शिवसेनेच्या नगरसेवकाने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. त्यामुळे ठाण्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात भूकंप आला आहे. शिवसेनेचे ठाण्यातील नगरसेवक गणेश कांबळे असे त्या पीडित नगरसेवकाचे नाव असून त्यांनी फेसबुकच्या थेट प्रसारणात आपल्यावर आलेल्या प्रसंगाचे वर्णन करत फिनाईल प्राशन केले. त्यामुळे गंभीर अवस्थेत त्यांना ठाण्याच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पत्नीच्या छळाला कंटाळून शिवसेनेच्या नगरसेवकाचा 'फेसबुक लाईव्ह' करुन आत्महत्येचा प्रयत्न

या लाईव्हमध्ये कांबळे यांनी ' वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी आपण एका बारबालेच्या प्रेमात पडून लग्न न करताच तिच्याबरोबर संसार करू लागलो, असे ते म्हणाले. त्या बारबालेपासून आपल्याला दोन मुले असून तिने आपला प्रचंड मानसिक छळ केल्याचे त्यांनी या प्रक्षेपणात सांगितले. न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने देखील आपली बाजू ऐकून न घेतल्याने आता काहीच मार्ग न उरल्याने आपण हे टोकाचे पाऊल उचलत आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आपली न्यायव्यवस्था ही संपूर्णतः महिलांना पाठिशी घालणारी असल्याने आपल्याला न्याय मिळाला नाही. त्यामुळे आपल्या मृत्यूस आपली न्यायव्यवस्था असल्याचे त्यांनी आपल्या फेसबुक प्रक्षेपणात स्पष्ट केले आहे. या प्रकारानंतर कळवा पोलिसांनी याबाबत घटनेची दखल केली असून पुढील तपास कळवा पोलीस करत आहेत.

Last Updated : May 19, 2020, 5:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.