ठाणे - नागरिकांचा विरोध असलेल्या वागळे इस्टेट येथील डम्पिंग ग्राउंडला आज ठाणे महानगर पालिका विरोधी पक्ष नेते शानू पठाण ( Shanu Pathan on corruption by contractors ) यांनी भेट दिली. काही ठेकेदारांमुळे येथे भ्रष्टाचार होत असल्याचा त्यांनी आरोप केला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांनादेखील धारेवर घेतले आहे.
ठाणे महानगर पालिका विरोधी पक्ष नेते शानू पठाण यांनी वागळे इस्टेट येथील डम्पिंग ग्राउंड ( Wagle Estate Dumping ground issue ) येथील कचऱ्याचा आणि कामाचा आढावा घेतला. ठाणे शहरातील कचरा जमा होऊन विलगीकरणाचे काम होत असताना मोठ्या प्रमाणात येथे कचऱ्याचे ढीग जमा होतात. यामुळे स्थानिक नागरिकांना दुर्गंधी व रोगराई तसेच अनेक त्रासांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला.
हेही वाचा-मुंबईतील कचरा विल्हेवाटीचा प्रश्न सुटणार, महापालिका करणार कचऱ्यातून वीजनिर्मिती
डम्पिंगचे नियोजन करण्याकरिता चर्चा करणार-
वागळे इस्टेट येथील डम्पिंग ग्राउंडचा विषय अत्यंत गंभीर आहे. गेल्या २० वर्षांपासून येथे कचऱ्याची समस्या उद्भवत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. तर येथील काही स्थानिक नागरिक उपोषणाला बसले आहेत. डम्पिंगचे नियोजन कशा प्रकारे करता येथील याबद्दल आयुक्त, महापौर तसेच सत्ताधारी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे यावेळी शानू पठाण ( Shanu Pathan on Dumping ground issue ) यांनी सांगितले.
हेही वाचा-ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील 'हे' विभाग अनिश्चीत कालासाठी पूर्णत: बंद
कचऱ्याच्या समस्येपासून सुटका करण्याची स्थानिकांची मागणी-
१५ वर्षांपासून आम्ही या विभागात राहत आहोत. येथे असलेल्या या कचऱ्याचा खूप त्रास सहन करावा लागतो. या कचऱ्यामुळे घरात किडेदेखील येतात. हे डम्पिंग येथून हलवावे व या कचऱ्यातून सुटका व्हावी, अशी मागणी यावेळी येथील स्थानिकांनी ( Thane Citizens on Dumping ground ) केली आहे.
दरम्यान, डम्पिंग ग्राउंडबद्दल नागरिकांचा विरोध असताना ठाणे महानगरपालिका यावर कशा प्रकारे निर्णय घेते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा-ठाण्यातील वागळे इस्टेटमधील बायोसेन्स कंपनीला भीषण आग, चार तासानंतर आग आटोक्यात