ठाणे - कोट्यावधी रुपयांच्या कथीत खंडणी वसुलीप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्यासह तब्बल 29 आरोपींवर ठाणे नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. मात्र, न्यायालयात आरोपपत्र सादर न केल्याच्या कारणास्तव आरोपींनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. जामीन अर्जावर ठाणे न्यायालयात मंजुरीचे शिक्कामोर्तब करण्यात आले. या दोन्ही आरोपींना जामीन मंजूर झाल्याने सरकारी वकील आणि फिर्यादी यांचे वकील यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
सरकारी वकिलांचे गंभीर आरोप -
आज सुनावणी दरम्यान उपस्थित असलेले सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कालच्यासारखे आज देखील पोलिसांवर आरोप करत पोलीस आपल्याला कोणत्याच प्रकारचे सहकार्य करत नसल्याचे सांगितले. सरकारी वकील म्हणून आपली नेमणूक झाल्यानंतर आजपर्यंत पोलिसांनी आपल्याला कोणतीच माहिती दिली नसून आपण पोलिसांच्या तपासासंबंधी अनाभिज्ञ् असल्याचे सांगितले. तपास करणारे पोलिसांच्या या असल्या भूमिकेमुळे आपण प्रचंड नाराज असल्याचे सांगत आपली नाराजी व्यक्त केली. दरम्यान, दोन्ही आरोपींनी न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, 60 दिवसांनंतरही पोलिसांनी आरोपपत्र दाखल न केल्याने न्यायायलाने त्यांना जामीन मंजूर केला.
हेही वाचा - Corona Third Wave : महाराष्ट्रात तिसरी लाट आली तर, सौम्य स्वरूपाची असेल - राजेश टोपे