ETV Bharat / city

११ महिन्यांच्या मुलासाठी अभिनेत्याची आर्थिक मदतीची याचना

माझ्या नवऱ्याची बायको, लव्ह लग्न लोचा, तू माझ्या सांगाती, तारक मेहता का उलटा चष्मा, अशा मराठी आणि हिंदी मालिकांमधून काम करणाऱ्या कलाकारावर लॉकडाऊनच्या काळात संकट आले आहे. कलाकार अतुल वीरकर आपल्या मुलाच्या वैद्यकीय खर्चासाठी सर्वांकडे मदतीची याचना करत आहे.

author img

By

Published : Jul 18, 2020, 12:19 PM IST

Updated : Jul 18, 2020, 12:41 PM IST

Priyansh Veerkar
प्रियांश वीरकर

ठाणे - लॉकडाऊनमध्ये लाखो लोक बेरोजगार झाले असून अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाऊनच्या परिणांमापासून कोणीही स्वत:ला वाचवू शकलेले नाही. या परिस्थितीत मराठी आणि हिंदी मालिकांमधून छोट्या-छोट्या भूमिका करणारा कलाकार अतुल वीरकर हा दुहेरी संकटांचा सामना करत आहे. अतुल आपल्या 11 महिन्यांच्या मुलाच्या उपचारासाठी सर्वांना मदतीची याचना करत आहे.

अभिनेता अतुल वीरकरने आपल्या मुलाच्या उपचारांसाठी मदतीची याचना केली आहे

माझ्या नवऱ्याची बायको, लव्ह लग्न लोचा, तू माझ्या सांगाती, तारक मेहता का उलटा चष्मा, अशा मराठी आणि हिंदी मालिकांमधून काम करणाऱ्या कलाकारावर लॉकडाऊनच्या काळात संकट आले आहे. अतुल ठाण्यातील वर्तकनगर येथे त्याच्या पत्नी आणि मुलासह राहतो. त्याला प्रियांश नावाचा अकरा महिन्यांचा मुलगा आहे. तो एक महिन्याचा असताना त्याला फीट आली आणि तेव्हापासून त्याचे शरीरावरचे नियंत्रण सुटले. त्याला डेव्हलपमेट डिले डिसऑर्डर झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले आहे. फेब्रुवारी महिन्यापासून प्रियांशवर हिंदुजा रुग्णालयात डॉ. अभिषेक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत उपचारासाठी दोन ते अडीच लाख रुपये खर्च आला आहे.

मात्र, पुढील उपचारासाठी अतुलकडे आता पैसे नाहीत. रोजगार पुन्हा कधी सुरू होईल, हे सांगता येत नाही. मुलाच्या उपचारासाठी नेमके काय करायचे, अशा द्विधा अवस्थेत वीरकर दाम्पत्य सापडले आहे. अतुल सर्वांकडे मदतीची याचना करत आहे. सध्या कोरोनामुळे अंधेरी येथील एका क्लिनिकमध्ये प्रियांशवर उपचार सुरू आहेत. कोरोना मिटला की पुन्हा हिंदुजा रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. त्यासाठी डॉक्टरांनी ७ ते ८ लाख रुपयांचा खर्च सांगितला आहे. 'तुमची मदत माझ्या मुलाला आजारातून मुक्त होण्यास खूप उपयोगी ठरेल. खालील बँक खात्यावर तुम्ही मदत पाठवू शकता, असे आवाहन अतुलने आणि त्याच्या पत्नीने केले आहे.

मदतीसाठी माहिती -
भारतीय स्टेट बँक

शाखा - समतानगर, ठाणे(प.)

अतुल अशोक वीरकर

खाते क्रमांक - 11252479538

आयएफसी कोड - SBIN0013035
गुगल पे क्रमांक - 9764377363
गुगल पे क्रमांक - 9967380241

Last Updated : Jul 18, 2020, 12:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.