ETV Bharat / city

अपहरण करून विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या रिक्षाचालकास अटक - Rickshaw driver arrested

रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या अध्यक्षा ज्योती गायकवाड यांच्या सतर्कतेमुळे व पोलिसांच्या तत्काळ कारवाईमुळे नराधमाच्या मुसक्या आवळण्यात पडघा पोलिसांना यश आले आहे.

महिलेवर अत्याचार
महिलेवर अत्याचार
author img

By

Published : Mar 31, 2021, 5:45 PM IST

ठाणे - एका नराधम रिक्षाचालकाने पीडित विवाहितेचे रिक्षातून अपहरण करत तिला निर्जनस्थळी असलेल्या खोलीत डांबून तिच्यावर सतत दोन दिवस मारहाणीची धमकी देऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या अध्यक्षा ज्योती गायकवाड यांच्या सतर्कतेमुळे व पोलिसांच्या तत्काळ कारवाईमुळे नराधमाच्या मुसक्या आवळण्यात पडघा पोलिसांना यश आले आहे. शारदाप्रसाद देवमडी मिश्रा (वय ५५, रा. खडवली) असे अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे.

पीडितेचे रिक्षातून अपहरण

भिवंडी तालुक्यातील पडघा-बोरिवली गावात २५ वर्षीय पीडिता कुटुंबासह राहते. ती गुरुवारी सकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे धुणी-भांड्याचे काम करण्यासाठी आपल्या सासुबरोबर जात होती. मात्र त्या दिवशी तिची तब्बेत नव्हती. परंतू काही वेळाने तिला बरे वाटल्याने ती सकाळच्या सुमारास कामाला जात असताना आरोपी रिक्षाचालक शारदा प्रसाद याने तिला रस्त्यातच गाठून जबरदस्तीने रिक्षात बसवून तिचे अपहरण केले. मात्र तिची तब्बेत बरी नसल्याने ती चक्कर येऊन रिक्षात झोपली. त्यानंतर शुद्धीवर आली त्यावेळेस ती एका खोलीत विवस्त्र अवस्थेत होती. तसेच आरोपी रिक्षाचालकदेखील विवस्त्र अवस्थेत होता. हे पाहून पीडिता भयभीत झाल्याने तिला धक्काच बसून तिला समजले की या नराधमने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.

दोन दिवस बंद खोलीत डांबून अत्याचार

पीडिताने रिक्षाचालकास घरी जायचे असल्याचे सांगितले, परंतू या नराधम रिक्षाचालकाने तिला मारहाणीची धमकी देत त्या खोलीत कोंडून तो सायंकाळी कुठेतरी बाहेर गेला असता पीडितेने तिच्या पतीस मोबाइलवरून फोन करण्याचा प्रयत्न केला परंतु बॅलन्स नसल्याने संपर्क झाला नाही. काही वेळाने हा नराधम पुन्हा घटनस्थळी आला व त्याने तिच्यावर पुन्हा बळजबरीने अत्याचार केला.

पोलीस व महिला संघटनेने लावला पीडितेचा शोध

घटनेच्या दुसऱ्या दिवशी रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या अध्यक्षा ज्योती गायकवाड यांना पीडितेच्या आईचा फोन आला असता ज्योती गायकवाड यांनी पीडित महिलेचा मोबाइल नंबर मिळवून पीडित महिलेशी संपर्क केला असता पीडिताने पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या लकी हॉटेल असे बोलताच फोन बंद झाला. या पुराव्याच्या आधारे गायकवाड यांनी शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे व शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम आढाव यांना संपर्क करून अपहरण झाल्याचा प्रकार सांगितला.

नाकाबंदी केल्याने आरोपी सापडला तावडीत

पोलीसांनी तत्काळ आसनगाव येथील परिवार गार्डन हॉटेलसमोर नाकाबंदी केली. त्यावेळी पोलिसांसमवेत ज्योती गायकवाड तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी ढवळे यांनी पडघा पोलीस उपनिरीक्षक राजकुमार आडगळे यांना पुढील तपास करण्यास सांगितले. दरम्यान नराधम रिक्षाचालक MH05 BG1689 या क्रमांकाच्या रिक्षाने पीडितेला खडवली फाट्यावरील लकी हॉटेल येथे घेऊन आला. त्याच सुमारास पीडितेच्या भावाने संपर्क केला असता तिने लकी ढाबा येथे असल्याचे सांगितले असता त्या ठिकाणी धाव घेऊन पीडितेची त्या नराधमाच्या तावडीतून सुटका करून नराधमाला घेऊन पडघा पोलीस ठाण्यात आणले.

आरोपीला पोलीस कोठडी

या प्रकरणी नराधम रिक्षाचालक शारदा प्रसाद याच्यावर पडघा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता १८६० अधिनियमानुसार कलम ३६३, ३७६ व ३४२नुसार गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर पीडित महिलेस तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या गुन्ह्याचा अधिक तपास पडघा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजकुमार आडगळे करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.