ETV Bharat / city

Pregnant Woman Died : सोनोग्राफीच्या डॉक्टरने दिला चुकीचा रिपोर्ट; गरोदर महिलेचा मृत्यू - Pregnant woman death

सोनोग्राफीचा चुकीचा रिपोर्ट दिल्याने (wrong report given by sonography doctor in Thane) एका गरोदर २८ वर्षीय महिलेच्या मृत्यू झाल्याची (Pregnant Woman Died in Thane) धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टर विरोधात कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल (Case filed against sonography doctor) करण्यात आला आहे. अमोल ज्ञानदेव वानाईत (वय,३७) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. तर अश्विनी गणेश साळूंके (वय २८) असे मृत्यू झालेल्या गरोदर महिलेचे नाव आहे. (Latest News from Thane) (Thane Crime)

Pregnant Woman Died in Thane
Pregnant Woman Died in Thane
author img

By

Published : Oct 8, 2022, 5:50 PM IST

ठाणे : सोनोग्राफीचा चुकीचा रिपोर्ट दिल्याने (wrong report given by sonography doctor in Thane) एका गरोदर २८ वर्षीय महिलेच्या मृत्यू झाल्याची (Pregnant Woman Died in Thane) धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टर विरोधात कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल (Case filed against sonography doctor) करण्यात आला आहे. अमोल ज्ञानदेव वानाईत (वय,३७) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. तर अश्विनी गणेश साळूंके (वय २८) असे मृत्यू झालेल्या गरोदर महिलेचे नाव आहे. (Latest News from Thane) (Thane Crime)

सोनोग्राफी रिपोर्टनुसार उपचार होते सुरू - मृतक अश्विनी ही भिवंडी तालुक्यातील कोनगाव परिसरातील गावदेवी येथे कुटूंबासह राहत होती. ती गरोदर राहिल्यानंतर तिच्यावर २४ मार्च २०२१ ते १८ एप्रिल २०२१ सालच्या दरम्यान कल्याण पश्चिम भागातील सिंडीकेट येथील वैष्णवी नावाच्या खाजगी रुग्णालयात गरोदरपणाचे उपचार सुरू होते. वैष्णवी हॉस्पिटलचे डॉ. अश्विन कक्कर यांनी सोनोग्राफी रिपोर्टसाठी खडकपाडा भागातील गोदरेज हिल भागात सोनोग्राफी सेंटर चालविणारे तज्ज्ञ डॉ. अमोल वानाईत यांच्याकडे सोनोग्राफी करण्यासाठी पाठवले होते. त्यावेळी डॉ. अमोल वानाईत यांनी सोनोग्राफी जो रिपोर्ट दिला. त्या रिपोर्टनुसार मृतक अश्विन यांच्यावर डॉ. कक्कर उपचार सुरू केले. मात्र उपचारादरम्यान गर्भवती असलेल्या अश्विनी साळुंखेचा मृत्यू झाला. खळबळजनक बाब म्हणजे अश्विनी हिच्या सोनोग्राफी अहवालानुसार तिच्या पोटातील गर्भाची वाढ होत नसल्याने तिला गर्भपाताच्या गोळ्या खाण्यास दिल्या होत्या. या गोळ्या खाल्ल्याने १८ एप्रिल २०२१ रोजी तिचा मृत्यू झाला.

जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अभिप्रायनुसार गुन्हा दाखल - सोनोग्राफी तज्ज्ञ डॉ. अमोल वानाईत यांच्या चुकीच्या रिपोर्ट आणि हलगर्जीपणा अश्विनी साळुंखे हिचा मृत्यू झाला आहे. तसा अभिप्राय ठाणे जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिला. या अभिप्रायनुसार अश्विनीच्या मृत्यूस सोनाग्राफी तज्ञ डॉ. वानाईत हे जबाबदार असल्याचे नमूद केल्याने ८ ऑक्टोंबर २०२२ रोजी कोनगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरणकुमार वाघ (वय ४१) यांच्या फिर्यादीवरून डॉ. अमोल वानाईत यांच्या विरोधात भादवी कलम ३०४, (अ) अन्वये गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा अधिक तपास कोनगाव पोलिसांकडून सुरू करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.