ETV Bharat / city

नवाब मलिकांकडून प्रश्नांची उत्तरे कशी मिळवणार, जेलमध्ये जायचे की स्क्रिन लावणार? - भाजप नेते प्रवीण दरेकर

अधिवेशन सुरू होणार आहे आणि नवाब मलिक हे जेलमध्ये आहेत आणि सत्तेवर असलेली नेतेमंडळी त्यांचा राजीनामा घेत नाही. मग अधिवेशनात त्यांच्या खातेविषयी काही प्रश्न समोर आले तर मग काय त्यांच्यासाठी जेलमध्ये स्क्रीन लावणार का? असा सवाल उपस्थित करत सरकारवर टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर ( Pravin darekar comment on Nawab Malik resignation ) यांनी केली.

author img

By

Published : Mar 2, 2022, 10:10 PM IST

pravin darekar comment on Nawab Malik thane
नवाब मलिक राजीनामा प्रवीण दरेकर टीका ठाणे

ठाणे - अधिवेशन सुरू होणार आहे आणि नवाब मलिक हे जेलमध्ये आहेत आणि सत्तेवर असलेली नेतेमंडळी त्यांचा राजीनामा घेत नाही. मग अधिवेशनात त्यांच्या खातेविषयी काही प्रश्न समोर आले तर मग काय त्यांच्यासाठी जेलमध्ये स्क्रीन लावणार का? असा सवाल उपस्थित करत सरकारवर टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर ( Pravin darekar comment on Nawab Malik resignation ) यांनी केली.

प्रतिक्रिया देताना भाजप नेते प्रवीण दरेकर

हेही वाचा - मंत्री कपील पाटीलांनी मुस्कानला दिला धीर, सरकार लवकरच मायदेशी आणणार असल्याचे सांगितले

हे सरकार हुकूमशाही पद्धतीने, अहंकाराने भरलेले सरकार आहे. बॉम्बस्फोटातील आरोपीची जागा घेतल्याचे सिद्ध झाले त्यामुळे न्यायालयाने मलिकांना अटकेचे आदेश दिलेत. यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे होता, परंतु त्यांच्यातील ठाकरे बाणा संपला आहे, त्यांच्यातील ठाकरे बाणा दाखवणे गरजेचे असताना ते सत्तेसाठी हतबल झाल्याचे दिसत आहेत, असा टोलाही दरेकरांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

जेव्हा चोरलेले दागिने चोर ज्या सोनाराला विकतो त्यावरही पोलीस कारवाई करतात, मग मालिकांवर कारवाई का नाही झाली पाहिजे? असा मोठा सवाल उपस्थित करत आम्ही मालिकांचा राजीनामा घेणारच, अशी भूमिका आमच्या पक्षाची आहे, असे दरेकरांनी सांगितले. कोणतेही आरक्षण असो, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सरकार करत आहे. तुम्ही सरकारमध्ये आहेत आणि आरक्षणासाठी विरोधकांना जबाबदार धरायचे ही वेगळीच पद्धत सत्ताधाऱ्यांनी शोधली आहे. एसटी संपाबाबत सरकार गंभीर नाही, त्यांच्या बद्दलचा अहवाल लपून छापून का ठेवत आहेत. त्यांना फक्त आपली खुर्ची टिकवायची आहे, असे देखील दरेकर म्हणाले.

संजय राऊत यांनी ट्विट केले की, किरीट सोमैया व त्यांचा मुलगा जेलमध्ये जाणार. यावर या संदर्भात कोर्ट निर्णय घेईल. संजय राऊत याना कोणी ऑथोरिटी दिली माहिती नाही. कोणाला जेलमध्ये टाकायचे किंवा नाही टाकायचे हे तेच ठरवतात, अशी टिकाही दरेकर यांनी राऊत यांच्यावर केली.

हेही वाचा - Kalwa Police Arrested two Accused : फेरीवाल्यांच्या वेशातील सराईत गुन्हेगारांनी केली घरफोडी, दोघे अटकेत

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.